मुंबई - वर्धा येथील हिंगणघाट येथे एका महाविद्यालयीन शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या घटनेचा निषेध केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी अशा व्यक्तींनी कठोर शिक्षा झाली पाहिजे असेही सुळे म्हणाल्या.
हिंगणघाटची घटना ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी - सुप्रिया सुळे
वर्धा येथील हिंगणघाट येथे एका महाविद्यालयीन शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या घटनेचा निषेध केला आहे.
सुप्रिया सुळे
हिंगणघाटमधील नांदोरा चौकात आज (सोमवार) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये तरुणी जखमी झाली असून, तिला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. तिची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेचा सुप्रिया सुळेंनी निषेध केला आहे. अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2020, 11:33 PM IST