मुंबई - आरे वसाहत येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचे अभिनंदन करुन विकासासाठी आमचे सहकार्य असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच विकास व्हायलाच हवा मात्र, पर्यावरणाचा समतोल ठेवायला हवा, असेही सुळे म्हणाल्या.
पर्यावरणाचा समतोल राखूनच विकास व्हावा, आरेच्या निर्णायाबद्दल उद्धव ठाकरेंचे अभिनंदन - सुप्रिया सुळे - पर्यावरणाचा समतोल राखूनच विकास व्हावा
आरे वसाहत येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचे अभिनंदन करुन विकासासाठी आमचे सहकार्य असल्याची भूमिका घेतली आहे.
पर्यावरणाचे रक्षण हे आपल्यापुढे खुप मोठे आव्हान असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. विकासासाठी पर्यावरणाचे नुकसान करणे अयोग्य आहे. आज उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सुळे म्हणाल्या.
आरे मेट्रो कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. रातोरात झाडांची कत्तल केलेले मला मान्य नाही. मी आरेतील एकाही झाडाच्या पानाला हात लावू देणार नसल्याचेही ठाकरे म्हणाले. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या निर्णयाला विरोध केला. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही. हेच या निर्णयातून दिसून येते. शेवटी 'हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच' असे ट्वीट करत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
TAGGED:
supriya sule Aarey Metro CarShed