मुंबईSupreme Court On Bhide Wada Smarak : शिक्षणामध्ये ज्यांनी क्रांती घडवली. त्या सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) आणि महात्मा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी भिडे वाड्यात शुद्र अतिशूद्र मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ते राष्ट्रीय स्मारक (Bhide Wada Smarak) व्हावे म्हणून 2006 पासून पुणे महानगरपालिकेने त्याबाबत निर्णय घेतला होता. परंतु तेथील भाडेकरूंनी त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाने 15 दिवसांपूर्वी ते स्मारक होण्यासंदर्भातला निर्णय दिला होता. त्यानंतर भाडेकरूनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा आव्हान याचिका दाखल केली असता, सर्वोच्च न्यायालयाने याचिका रद्द केली. तसेच तुम्हाला आता दंड लावलाच पाहिजे असे खडसावलं.
भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक: 2006 यावर्षी पुणे महानगरपालिकेने जनतेच्या मागणीनंतर ज्या ठिकाणी महाराष्ट्रात शूद्र अति शूद्र आणि सर्व जाती जमातीसाठी भिडे वाड्यात शाळा सुरू झाली. त्या भिडेवाडीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं, असा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबत महाराष्ट्र समता परिषदेचे अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील पाठपुरावा केला होता.
राष्ट्रीय स्मारकाच्या निर्णयाला आव्हान : भिडे वाड्याच्या ठिकाणी राहणाऱ्या 24 भाडेकरूंनी पुणे महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. यासंदर्भात ऐंशी वेळा न्यायालयात सुनावणी झाली. पंधरा दिवसापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्वाळा दिला. त्यात भिडेवाड्याला स्मारक बनवण्यासंदर्भात निर्णय देत ती याचिका फेटाळून लावली.