मुंबई -आजारपणावरून सततच्या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीची चाकू भोकसून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील चिराबाजार घडली आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली असून हत्येनंतर पतीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. आनंद मखिजा (65) आणि कविता मखिजा (60) असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे.
मुंबईत पत्नीची हत्या करून वृद्धाची आत्महत्या हेही वाचा -जामिनावर सुटून ३० घरफोडी करणारा 'मॉडेल' पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद मखिजा यांची पत्नी कविता हिला दम्याचा त्रास होता. कविता मखिजा यांच्या आजारपणावरून पती पत्नीमध्ये सतत भांडणे होत होती. आनंद मखिजा आणि त्यांची पत्नी कविता मखिजा यांच्यासोबत त्यांची मुलगी राहत होती. गुरुवारी काही कामानिमित्त आनंद मखिजा यांची मुलगी बाहेर गेल्यावर पुन्हा दोघात भांडण झाल्याने रागाच्या भरात किचन मधील चाकूने आनंद मखिजा यांनी त्यांच्या पत्नीच्या पोटात चाकू भोसकून तिची हत्या केली. या नंतर त्यांनी स्वतः आत्महत्या केली.
हेही वाचा -औरंगाबादेत पुन्हा पीडितेवर बलात्कार, जामिनावर सुटून आलेल्या आरोपीचे कृत्य