मुंबई :एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने आपल्या मागणीसाठी पाठपुरावा केलेला होता. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे तसेच डॉ. रणजित पाटील यांच्यामार्फत तसेच सत्ताधारी पक्षातील काही आमदारांद्वारे देखील विद्यार्थ्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्या मागणीला अद्यापही यश येत नसल्याने विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना भेटून या मागणी संदर्भात विनंती केली होती. विद्यार्थ्यांच्या भावना मांडण्यासाठीच रोहित पवार यांनी आज या संदर्भातली कळकळीची मागणी शासनाकडे मांडली. शासनाने या संदर्भातला निर्णय घेण्याच्या आधीच रोहित पवार यांचे वक्तव्य प्रसार माध्यमात प्रसारित झाले. त्यामुळे एमपीएससी नविन अभ्यास क्रमाची उत्सुकता ताणली गेली होती.
राज्य सरकार करणार विनंती :आमदार रोहित पवार यांच्या प्रस्ताव नंतर मंत्रिमंडळ समिती सदस्यांनी गंभीर विचार सुरू केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखील सकारात्मक विचार करावा अशी विनंती केली. त्या आधारावर आता लवकरच सुधारित एमपीएसी अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची शिफाकर राज्य सरकार करणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंदर्भातला कोणताही निर्णय करायचा असेल तर आयोगच स्वतः करू शकतो. त्याचे कारण हा आयोग स्वायत्त आहे. याला संविधानिक अधिकार बहाल केले गेले आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ फार फार तर केवळ विनंती सूचना किंवा प्रस्ताव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे दाखल करू शकते.