महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राणे पुन्हा तोंडघशी; भाजपच्या सत्ता स्थापनेबाबतचे त्यांचे मत व्यक्तिगत - मुनगंटीवार

भाजपची 145 ची जुळवाजुळव सुरू आहे. सत्तास्थापनेसाठीची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी फडणवीसांनी माझ्यावर सोपवली आहे. शिवसेना आघाडीबरोबर जाणं शक्य नाही. शिवसेनेचा अभ्यास कमी पडला आहे.

नारायण राणे - भाजप खासदार

By

Published : Nov 13, 2019, 7:49 AM IST


मुंबई -नारायण राणे यांनी सरकार स्थापनेसंदर्भात केलेला दावा हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत असा कुठलाही निर्णय झालेला नाही, असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राणे मात्र तोंडघशी पडले आहेत.

भाजपची 145 ची जुळवाजुळव सुरू आहे. सत्तास्थापनेसाठीची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी फडणवीसांनी माझ्यावर सोपवली आहे. शिवसेना आघाडीबरोबर जाणं शक्य नाही. शिवसेनेचा अभ्यास कमी पडला आहे. सत्तास्थापनेसाठी विलंब होणं अयोग्य आहे, असं नारायण राणे मंगळवारी घडलेल्या सेना -काँग्रेस- राष्ट्रवादीच्या राजकीय नाट्यानंतर म्हणाले होते. मात्र, त्याचा हा दावा मुनगंटीवार यांनी फेटाळला आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आज राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा आदर केला. शेतकरी संकटात आहे. अनेक समस्या आहेत. असे असताना जनादेशाचा अनादर करण्यात आला. त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली, असं मुनगंटीवार यांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठकीनंतर म्हटलं आहे. दरम्यान, मुनगंटीवार यांच्या या विधानाला राणे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details