महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांत आत्महत्या प्रकरणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे स्पष्टीकरण म्हणाले...

सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी एफआयआर का दाखल केला नाही याबद्दल खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी ट्विटरवर पोस्टमार्टम रिपोर्टला तात्पुरते का मानले गेले यावर आपले विचार देखील शेअर केले.

सुब्रमण्यम स्वामी यांचे स्पष्टीकरण
सुब्रमण्यम स्वामी यांचे स्पष्टीकरण

By

Published : Jul 31, 2020, 4:27 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नव-नवीन गोष्टी पुढे येत आहेत. यात आज भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आत्तापर्यंत एफआयआर का दाखल केली नाही, असा प्रश्न विचारला आहे. तसेच, पोलीस त्याच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टवरही 'प्रोव्हीजनल' म्हटले आहे याचे कारण काय. तर, दोघांचेही एकच कारण आहे, ते म्हणजे डॉक्टर फोरेन्सिक विभागाकडून सुशांतच्या विसारा रिपोर्ट येण्याचा प्रतिक्षेत आहेत. जेणेकरून सुशांतला विष देण्यात आलं होतं की नाही याबाबत उलगडा होऊ शकेल, असे स्वामी म्हणाले आहेत.

याआधी सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारीदेखील एक ट्विट केले होते. ज्यात त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या हत्येची शंका असल्याचे म्हटले होते. ट्विटमध्ये त्यांनी 'मला सुशांतची हत्या झाली असावी, असे वाटत आहे' असे नमूद केले होते. तसेच या ट्विटसोबत एक कागदपत्रही जोडले होते. या कागदपत्रात नमूद करण्यात आलेल्या २६ बिंदूंचा उल्लेख आहे. यातील २४ बिंदूंमध्ये सुशांतची हत्या झाली असावी अशी थ्योरी आहे तर, उर्वरित २ बिंदूं त्याच्या आत्महत्येच्या थ्योरीला समर्थन करतात. या कागदपत्रातील बाबींमध्ये, सुशांतच्या गळ्यावरील खूना(निशान) त्यानी आत्महत्या केल्याच्या बाबींना स्पष्ट करत नाही, मात्र हत्येच्या दिशेने संकेत देतात असे म्हटले आहे. सोबतच, स्वामी यांनी नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी याप्रकरणी चर्चा केली असून, सुशांत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, १४ जून रोजी सुशांतसिंहने आत्महत्या केली होती. त्या आधी सुशांत आणि रिया चक्रवर्ती रिलेशनशिपमध्ये होते. याप्रकरणी ही आत्महत्या नसून हत्या असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि मुंबई पोलिसांनी रियासह इतर बॉलीवूड कलाकारांना समन्स बजावले. या सर्वांचे जबाब वांद्रे पोलिसांनी नोंदवले आहेत. तर दुसरीकडे सुशांतच्या वडिलांनी रियाने सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दूर केल्याचा आरोप केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details