महाराष्ट्र

maharashtra

प्रिन्स मृत्यू प्रकरणाचा पारदर्शक अहवाल सादर करा, स्थायी समितीत अध्यक्षांचे आदेश

By

Published : Nov 22, 2019, 8:41 PM IST

महानगरपालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून नावलौकिक असलेल्या केईएम रुग्णालयात हृदयोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी ईसीजी मशीनमध्ये शॉकसर्किट होऊन आग लागली. या आगीत प्रिन्स भाजल्याने त्याचा हात कापावा लागला. बुधवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.

प्रिन्स मृत्यू प्रकरण

मुंबई -महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेल्या प्रिन्स या बालकाच्या मृत्यूचे पडसाद स्थायी समितीत उमटले. प्रशासनाकडून प्रिन्सचा मृत्यू हा अपघात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्याला नगरसेवकांनी विरोध करत प्रिन्सच्या मृत्यूचे खरे कारण समोर आणावे, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर प्रिन्सच्या मृत्यूच्या चौकशीचा पारदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

प्रिन्स मृत्यू प्रकरणाचा पारदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश


महानगरपालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून नावलौकिक असलेल्या केईएम रुग्णालयात हृदयोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी ईसीजी मशीनमध्ये शॉकसर्किट होऊन आग लागली. या आगीत प्रिन्स भाजल्याने त्याचा हात कापावा लागला. बुधवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणाचे पडसाद स्थायी समितीत उमटले.

प्रिन्स मृत्यू प्रकरणाचा पारदर्शक चौकशी करावी

हेही वाचा - किशोरी पेडणेकर; नर्स ते मुंबईच्या महापौरपदापर्यंतचा प्रवास

प्रिन्सचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची खरी माहिती समोर आणावी. या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी व्हावी यासाठी पालिकेबाहेरच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, अशा मागण्या विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली.


या प्रकरणाची फॉरेन्सिक चौकशी सुरु असताना प्रशासन याला अपघात कसे म्हणते? चौकशी सुरु असताना अधिष्ठात्यांचे निलंबन का केले नाही? हे प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रिन्स सारखी प्रकरणे पालिका रुग्णालयात नेहमीच समोर येत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाचे नाव खराब झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.

हा अपघात; प्रशासनाचा दावा
प्रिन्सच्या मृत्यूबाबत उत्तर देताना प्रिन्सला निमोनिया झाला होता. त्याच्या हृदयात छिद्र होते. त्याला रुग्णलयात आणले तेव्हा त्याचे वजन कमी होते. रुग्णालयात आणल्यानंतर उपचारादरम्यान त्याचे वजन वाढले होते. रुग्णालयात मल्टी पॅरा ऑपरेशन सिस्टमच्या अकरा मशीन आणल्या होत्या. त्यांची १ सप्टेंबरला नियमीत पाहणीही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आगीची दुर्घटना घडली. याबाबत रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल चौकशी करत आहेत. तसेच पोलिसांनी संबंधित मशीन जप्त केल्या असून त्यांची फॉरेन्सिक चाचणी केली जात आहे. याप्रकरणात मानवी चूक दिसून येत नसल्याने हा एक अपघात आहे, असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त दराडे यांनी केले.

पारदर्शक अहवाल सादर करा -
प्रशासनाच्या या उत्तराला सर्व पक्षीय नगरसेवकांनी विरोध केला आहे. रुग्णालयात इतका मोठा प्रकार घडल्यावर पालिकेचे कोणी वरिष्ठ अधिकारी त्या कुटूंबाला भेटण्यासाठी गेले होते का? प्रिन्स प्रकरणाकडे त्यांनी लक्ष दिले होते का? प्रिन्सच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली, ती रक्कम त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली का? असे प्रश्न स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उपस्थित केले. प्रिन्सच्या मृत्यूचा पारदर्शक अहवाल सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details