मुंबई - शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत छत्रपती शेतकरी सन्मान योजना सुरूच राहणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कर्जमाफी योजना फसवी असल्याची टीका केली होती. यावर प्रसार माध्यमांशी बोलताना देशमुख यांनी कर्जमाफी योजनेबाबत भूमिका स्पष्ट केली.
लाभार्थी शेतकऱ्यांचे कर्जमाफ होईपर्यंत कर्जमाफीची योजना सुरूच राहणार - सुभाष देशमुख
शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत छत्रपती शेतकरी सन्मान योजना सुरूच राहणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कर्जमाफी योजना फसवी असल्याची टीका केली होती.
वाशीम जिल्ह्यातील शेतकरी अशोक मनवर यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला होता. मात्र, त्यांचे कर्जमाफ झाले नसल्याचा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी मदत पुनर्वसन मंत्री देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की मनवर यांच्यावर दोन प्रकारची कर्ज होती. त्यापैकी एक खाते त्यांचे कर्जमाफीने निरंक झाले. मात्र, त्यांचे पुनर्घटन कर्ज तसेच राहिले, त्यामुळे त्यांची कर्जमाफी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. यात कोणतेही तथ्य नाही.
कर्जमाफी जाहीर करताना राज्य सरकारने काही निकष केले होते. त्या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. पण निकषात न बसल्याने अपात्र घोषित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर सहायक निबंधक यांच्या नियंत्रणात समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे शेतकऱ्यांनी आपली पूर्ण माहिती द्यावी, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे. आतअपर्यंत 24 हजार कोटी कर्जमाफीची मान्यता देण्यात आली असून, 19 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तर उर्वरित सहायक निबंधकांच्या तपासणीनंतर पुढील कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.