महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविद्यालयीन निवडणुकांसाठी विद्यार्थी संघटनांची मोर्चेबांधणी सुरू - college

महाविद्यालयीन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एनएसयूआय विद्यार्थी संघटनेची रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक पार पडली. तर यापाठोपाठ लगेचच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकारिणीचीही शनिवारी मुंबईत बैठक झाली.

महाविद्यालयीन निवडणुकांसाठी विद्यार्थी संघटनांची मोर्चेबांधणी सुरू

By

Published : Jul 21, 2019, 8:57 AM IST

मुंबई -नवीन विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून महाविद्यालयीन निवडणुकांना पुन्हा एकदा बळ देण्यात आले असल्याने, या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्यात महाविद्यालयीन निवडणुकाही होणार आहेत. त्यासाठी राज्यभरातील विविध पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर एनएसयूआय विद्यार्थी संघटनेची रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक पार पडली. तर यापाठोपाठ लगेचच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकारिणीचीही शनिवारी मुंबईत बैठक झाली. या दोन्ही पक्षांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये राज्यात होत असलेल्या महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनांना आणि एकूणच सरकारला धारेवर धरण्यासंदर्भात एकमत झाले. त्यासाठी दोन्ही संघटनांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर लढण्यासाठीही निश्चित धोरण ठरले असून दोन्ही पक्षांनी आपली रणनीती ठरवली आहे.

महाविद्यालयीन निवडणुकांसाठी विद्यार्थी संघटनांची मोर्चेबांधणी सुरू

काँग्रेसच्या शुक्रवारी झालेल्या एनएसयुआय विद्यार्थी संघटनेच्या बैठकीत प्रामुख्याने महाविद्यालयीन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये आणि विशेषत: पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर एनएसयूआय, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, अनुसूचित जाती, जमाती यांना देण्यात येत असलेल्या सवलतींचा प्रश्न, अथवा अनेक महाविद्यालयांत आणि विद्यापीठांमधील प्रवेश, परीक्षा तसेच इतर अनेक अडचणी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन सामोरे जाणार असल्याचे एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी सांगितले.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत सुमारे दोनशेहून अधिक महाविद्यालयांमध्ये तर राज्यात असंख्य महाविद्यालयांत आपले प्रतिनिधी तयार करून त्यांच्यामार्फत महाविद्यालय निवडणुकांना सामोरे जाण्यासाठीची व्यूहरचना आखण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बैठकीमध्ये आगामी महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली त्याचबरोबर मुंबई शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रतिनिधी नेमून त्याठिकाणी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधी कसे निवडून येतील आणि आपल्या पक्षाला कसा फायदा होईल यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महाविद्यालय युनिट अध्यक्ष, मुंबई कार्यकारणी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन विद्यापीठ कायदा येऊन दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर भाजप सरकारने महाविद्यालयीन निवडणुका विधानसभेच्या तोंडावरच घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी यातून येत्या काळात राज्यात एक चांगली संधी विद्यार्थी प्रतिनिधींना उपलब्ध होणार असल्याने त्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी स्वागत केले आहे.

मुंबईत महाविद्यालय निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेकडून इतर समविचारी संघटनांच्‍या प्रतिनिधींसोबत एकत्र येऊन, ही निवडणूक लढवता येईल काय, यावर काही अंशाने भर दिला जाणार असल्याचेही मातेले यांनी सांगितले. तसेच भाजप सत्तेत असल्याने विद्या महाविद्यालय निवडणुकीसंदर्भात विद्यापीठ कायद्याची असलेली परी नियमितता योग्यपणे लागू केली जाईल काय, याबद्दलची शंकाही मातेले यांनी व्यक्त केली आहे.

विद्यार्थी संघटनांना हवा आहे असा बदल -

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याअंतर्गत जी परी नियमितता बनवली आहे. त्यावरआक्षेप घेतला गेला, की एटीकेटी या विद्यार्थ्यांनादेखील या प्रतिनिधी नेमणुकीमध्ये उमेदवार म्हणून सहभाग घेता यावा. तसेच 80 टक्के कॉलेजमध्ये हजेरी असली पाहिजे त्याबद्दलदेखील आक्षेप घेण्यात आला आहे. यासाठी काही त्रुटी परी नियमिततेत असल्याने राज्यपालांची भेट घेण्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details