महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 15, 2019, 7:07 PM IST

ETV Bharat / state

मुंबईत एनएनएसच्या विद्यार्थिनींनी साजरे केले रक्षाबंधन; रेल्वे कर्मचाऱ्यांसह पोलिसांना बांधल्या राख्या

किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशन येथे आज सकाळी एमएमपी शाह महाविद्यालय, माटुंगा येथील (NSS युनिट) विद्यार्थिनींनी स्थानकावरील रेल्वे कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.

एनएनएसच्या विद्यार्थ्यीनींनी पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत साजरे केले रक्षाबंधन

मुंबई -देशात आज स्वातंत्र्य दिनासह रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशन येथे आज सकाळी एमएमपी शाह महाविद्यालय, माटुंगा येथील (NSS युनिट) विद्यार्थिनींनी स्थानकावरील रेल्वे कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.

देशाची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामामुळे 'रक्षाबंधन' हा भावा-बहिणीचा पावित्र सण साजरा करता येत नाही. त्यामुळे एनएनएसच्या विद्यार्थिनींनी हा सण त्यांच्यासोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. तसेच, स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांनी स्थानकावर स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीदेखील काढली होती.

एनएनएसच्या विद्यार्थिनींनी पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत साजरे केले रक्षाबंधन

यावेळी वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांच्यासह अधिकारी राजेश बाबशेट्टी, स्टेशन मास्तर एन. के. सिन्हा, महाविद्यालयाचे एनएनएस युनिटचे प्रमुख राकेश आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details