मुंबई - आयआयटी परिसरात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात संकुलात आला होता. यावेळी बिबट्या कॅमेरात चित्रित झाला आहे. बिबट्याच्या दर्शनाने आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबई आयआयटी संकुलात बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण - मुंबई आयआयटी संकुलात बिबट्या
मुंबई आयआयटीने अशा प्राण्यांवर नियंत्रण राखण्यासाठी एक समिती नेमली आहे. मात्र, ही समिती यावर उपाययोजना करताना दिसत नाही. मुंबई आयआयटी संकुलात बिबट्या संचार करीत असतो. त्यामुळे आयआयटी संकुलातील विद्यार्थी कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयआयटी परिसरातील डोंगराळ भागातील संकुलात एक बिबट्या दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री कॅमेरात चित्रित झाला आहे. आयआयटी परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानला लागून आहे. त्यामुळे या ठिकाणी अधून मधून वन्यप्राण्यांचा वावर असते, असे आयआयटी प्रशासनाने सांगितले.
आयआयटी परिसरात मोकाट बैलांच्या झुंजीत एक विद्यार्थी जखमी झाला होता. त्यानंतर शिकवणी चालू असताना वर्गात गाय घुसली होती. यावर मुंबई आयआयटीने अशा प्राण्यांवर नियंत्रण राखण्यासाठी एक समिती नेमली आहे. मात्र, ही समिती यावर उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे बिबट्या या परिसरात संचार करीत असतो. त्यामुळे आयआयटी संकुलातील विद्यार्थी कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.