महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेत शीव आयुर्वेद रुग्णालयाचे विद्यार्थी चमकले - college

शीव येथे आयुर्विद्या प्रसारक मंडळ संचलित आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. येथील विद्यार्थी मे ते जून २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या विविध विद्या शाखेच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम आले आहेत.

शीव आयुर्वेद रुग्णालय

By

Published : May 25, 2019, 9:46 PM IST

मुंबई - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे मे ते जून २०१८ ला राज्यभरात घेण्यात आलेल्या विविध विद्या शाखा परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. या परीक्षेत शीव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

शीव येथे आयुर्विद्या प्रसारक मंडळ संचलित आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. येथील विद्यार्थी मे ते जून २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या विविध विद्या शाखेच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम आले आहेत. यात प्रथम वर्ष बी.ए.एम.एस ची विद्यार्थींनी नीरजा सुरेश आयर व द्वितीय वर्ष बी.ए.एम.एस ची विद्यार्थीनी कीर्ती भाऊसाहेब गायकवाड यांनी संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अन्सारी अहलान अब्दुल कादिर ही बी.ए.एम.एस बालरोग (कौमारभृत्य) या विषयात राज्यात प्रथम आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details