महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रंगबेरंगी चित्रांनी सजल्या भिंती, मुंबईत स्ट्रिट आर्टचे प्रदर्शन - street

सुमारे ३० महिला कलाकार आणि चित्रकारांनी एकत्र येत १० हजार चौरस भिंतीवर आणि इमारतींवर चित्रे चितारली आहेत. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून या ३० महिला कलाकार आल्या आहेत. त्यापैकी न्यूझीलंड आणि बोस्टनमधूनही दोन तरूणी आल्या आहेत. या कलाकारांनी साकारलेल्या वेगवेगळ्या डिझाईन खरचे मन मोहून टाकतील अशाच आहेत.

भिंतीवर चित्र साकारताना कलाकार

By

Published : May 1, 2019, 9:46 AM IST

मुंबई - रस्त्यावरील कला भारताच्या सांस्कृतिक विश्वाचा एक महत्त्वाचा घटक बनत चालली आहे. तरूणांमध्ये सध्या स्ट्रिट आर्टची प्रचंड क्रेझ आहे. या कलेला कुठल्या भाषेची गरज नाही. कुठलाही आणि कशाही प्रकारचा मेसेज तुम्ही स्ट्रीट आर्टच्या माध्यमातून देऊ शकता. अशाच काही महिला कलाकारांनी एकत्र येत मुंबईतल्या मरोळमध्ये रस्त्यांवर चित्रकृतींचे प्रदर्शन भरवले.

स्टिट आर्टचे थीम साँग

ग्रॅफिटी एजन्सी विकेंड ब्रोझ आणि मिल्ट्रीरोड रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन यांची ही संकल्पना आहे. या दोघांनी एकत्र येत भारतातील पहिले महिला स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल आयोजित केले होते. अंधेरीतल्या मरोळ आर्ट गावात मार्च २५ ते ३१ मार्च या कालावधीत या फेस्टिव्हलचे आयोजन केले होते.हे फेस्टिव्हल जरी संपले असले तरी चित्र रस्त्यांवर अजूनही आहेत. ते आपण कधीही जाऊन पाहू शकतो.

स्ट्रीट आर्ट फक्त पुरुषांची मक्तेदारी नसून, महिलादेखील यात अव्वल असल्याचे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि आपल्यातील प्रतिभा दाखवण्यासाठी एक संधी मिळावी हा या फेस्टिव्हलचा हेतू आहे. या भिंतींचा आर्ट कॅनव्हासप्रमाणे वापर केला, तर नक्कीच हे आर्ट वर्क लोकांचा ताण कमी करण्यास मदत करेल. आर्ट फेस्टिव्हल संपले असले तरी तुम्ही भारत वन, मिल्ट्रीरोड, मरोळ आर्ट व्हिलेज, अंधेरी (पू.), मरोळ आर्ट व्हिलेजमध्ये जाऊन तिथल्या चित्रांचा आनंद घेऊ शकता.

सुमारे ३० महिला कलाकार आणि चित्रकारांनी एकत्र येत १० हजार चौरस भिंतीवर आणि इमारतींवर चित्रे चितारली आहेत. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून या ३० महिला कलाकार आल्या आहेत. त्यापैकी न्यूझीलंड आणि बोस्टनमधूनही दोन तरूणी आल्या आहेत. या कलाकारांनी साकारलेल्या वेगवेगळ्या डिझाईन खरचे मन मोहून टाकतील अशाच आहेत. या पेंटिंग काढण्यासाठी परिसरातील रहिवाशांची परवानगी काढण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक बिल्डींगवर आर्ट साकारण्याची जबाबदारी एका - एका मुलीला देण्यात आली. फेस्टिव्हलमध्ये कार्यशाळा, कला प्रदर्शन, हिप-हॉप सायफर आणि स्ट्रीट आर्ट यांसारख्या विषयावर कार्यशाळा देखील घेण्यात आल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details