मुंबई - आरे मेट्रो कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगीती दिली आहे. रातोरात झाडांची कत्तल केलेले मला मान्य नाही. मी आरेतील एकाही झाडाच्या पानाला हात लावू देणार नसल्याचेही ठाकरे म्हणाले.
मी मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितपणे आलो आहे. ठाकरे कुटुंब स्वत:साठी कधी आग्रह धरत नाही. मात्र, माझ्याकडे ही जबाबदारी आली आणि ती जर मी स्वीकारली नसती तर तो बाळासाहेंबाच्या शिकवणीचा अपमान ठरला असता असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मी अद्याप सभागृह पााहिले नाही. मी मंत्रालयातही फार तर २ ते ३ वेळा आलो असल्याचे ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्रीपद हे मोठं आव्हान
राज्याचे मुख्यमंत्री होणे हे खूप मोठे आव्हान असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आपल्यापुढे अनेक प्रश्न आहेत. याचा सामना आम्हाला करायचा आहे. आलेल आव्हान सक्षमपणे पेलणार असून, जबाबदारी टाळणार नसल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.