महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai : रणजित सावरकरांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नोंदवला जबाब - स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक

स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात राहूल गांधींनी केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झालेला असताना आता हा वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला. (statement of ranjit savarkar recorded in shivaji park police station)

Mumbai
रणजित सावरकरांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नोंदवला जबाब

By

Published : Nov 28, 2022, 9:02 PM IST

मुंबई :काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झालेला असताना आता हा वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाकाकडून या प्रकरणामध्ये जाहीर निषेध नोंदवण्यात (statement of ranjit savarkar recorded) आला आहे.


स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी पोलिसांना पत्र लिहून राहुल गांधींना सावरकरांचा अवमान केल्या प्रकरणी अटक करावी अशी मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी रणजीत सावरकर यांचा जबाब आज शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दादरमधील शिवाजी पार्क पोलिसांना पत्र लिहून तक्रार केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लिहिलेल्या या पत्राच्या विषयामध्ये राहुल गांधी आणि नाना पटोले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते राहुल ? ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यानच्या (Rahul Gnadhi on Sawarkar) शेगाव येथील भाषणामध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती. त्यांना आंदमानमधील तुरुंगामध्ये कारावासासाठी पाठवण्यात आलं. तेव्हापासून ते ब्रिटीशांना चिठ्ठ्या लिहून माफी मागत होते, असं विधान राहुल यांनी आपल्या भाषणामध्ये केल्याने भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधींनी यासंदर्भातील पत्रकार परिषद घेत सावरकरांनी लिहिलेल्या एका चिठ्ठीचाही संदर्भ देत आपलं म्हणणं प्रसारमाध्यमांसमोर मांडलं. मात्र राहुल यांच्या भूमिकेवरुन त्यांना विरोधकांनी लक्ष्य केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details