महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ

सतेज पाटील आणि डॉ. विश्वजीत कदम हे राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आतापर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

बहुप्रतिक्षित ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
बहुप्रतिक्षित ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

By

Published : Dec 30, 2019, 8:09 AM IST

Updated : Dec 30, 2019, 8:58 AM IST

मुंबई- महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या काँग्रेस आमदारांची अधिकृत यादी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, के. सी. पाडवी, विजय वडेट्टीवार यांच्यासह 10 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

  • शपथ घेणाऱ्या नेत्यांची नावे -
  1. अशोक चव्हाण
  2. के सी पाडवी
  3. विजय वडेट्टीवार
  4. अमित देशमुख
  5. सुनिल केदार
  6. यशोमती ठाकूर
  7. वर्षा गायकवाड
  8. अस्लम शेख

हे नेते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

तर सतेज पाटील आणि डॉ. विश्वजीत कदम हे राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आतापर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर नाना पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

Last Updated : Dec 30, 2019, 8:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details