मुंबई :बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी राज्यातील दहावी आणि बारावी शिक्षण मंडळातर्फे 2023 मध्ये फेब्रुवारी मार्च या काळात लेखी परीक्षा घेतल्या जाणार (SSC HSC Board Exam Schedule) आहे. हे परीक्षेचे वेळापत्रक मंडळाने नुकतेच जाहीर केलेले आहे. राज्यामध्ये एकूण नऊ विभागीय मंडळ आहेत. यामध्ये कोकण, लातूर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर औरंगाबाद, पुणे, नागपूर व मुंबई इत्यादी विभाग येतात. या सर्व विभागातील दहावी आणि बारावीची परीक्षा मंडळाकडून घेतली (Board Exam Schedule Announced ) जाते.
वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध :राज्याच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा मंडळाच्या वतीने 19 सप्टेंबर 2022 पासून याबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध केलेले (HSC Board Exam Schedule) आहे. त्याच्यावर अनेक पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून सूचना मागवल्या होत्या. या अनेक सूचनांचे स्वागत मंडळाने केले. त्यानंतर त्यांनी दहावी व बारावीचे परीक्षेचे नियोजन नक्की केले आणि मग वेळापत्रक जाहिर केले आहे. ह्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते 25 मार्च 2023 ह्या काळात होईल. हे मंडळाने स्पष्ट केले आहे. www.maharashtrasscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेचे नियोजन वेळापत्रक (SSC Board Exam Schedule) पाहावे.
सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक :केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने शैक्षणिक सत्र 2022-23 साठी 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 15 फेब्रुवारी 2023 पासून बोर्डाच्या परिक्षेला सुरवात होणार आहे. CBSE च्या परिक्षा 5 एप्रिल 2023 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहीती बोर्डाने दिली आहे.
CBSE परीक्षेची तारीख पत्रक 2023:केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने शैक्षणिक सत्र 2022-23 साठी वर्ग 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसई वर्ग १०वी बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी, २०२३ ते २१ मार्च २०२३ पर्यंत. 12वी बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी, 2023 ते 05 एप्रिल, 2023 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
इतर परिक्षेचे वेळापत्रक लक्षात घेऊन तारखा जाहिर - CBSE ने इयत्ता 10वी, 12वी बोर्ड परीक्षेची तारीख पत्रक 2023 जाहीर करताना सांगितले की, साधारणपणे दोन्ही वर्गांमध्ये, दोन प्रमुख विषयांमधील परीक्षेत पुरेशी अंतर असणार आहे. सीबीएसईने म्हटले आहे की, इयत्ता 10वी, 12वीची तारीखपत्रक सुमारे 40 हजार विषयाचे संयोजन तयार केले आहे. जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याला एकाच तारखेला दोन विषयांसाठी उपस्थित राहावे लागणार नाही. केंद्रीय बोर्डाने पुढे सांगितले की, इयत्ता 12वीची तारीखपत्रिका तयार करताना, JEE मेन, NEET,CUET UG यासह इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखांशी टक्कर होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.