महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

SSC Board Exam 2023: आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू; राज्यभर कॉपीमुक्त वातावरणासाठी प्रशासनाचा चोख बंदोबस्त

बारावीनंतर आज राज्यातील महत्त्वाची समजली जाणारी दहावीची परीक्षा सुरू होत आहे. राज्यामध्ये सर्व जिल्हे मिळून 533 केंद्रावर साडेपंधरा लाख विद्यार्थी महत्त्वाची परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने याबाबत कडक व्यवस्था केली आहे.

SSC Board Exam 2023
दहावी बोर्डाची परीक्षा

By

Published : Mar 2, 2023, 11:29 AM IST

मुंबई :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या तर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेची सुरुवात नुकतीच काही दिवसांपूर्वी झाली. आजपासून दहावीच्या परीक्षेची सुरुवात होत आहे. राज्यभरात एकूण 533 केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने प्रशासनाने सगळ्या केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे. इयत्ता दहावीनंतर विविध ज्ञान शाखांमध्ये जाण्यासाठीचे सगळे मार्ग खुले होतात. त्यामुळे दहावीची परीक्षा हा आजही पायाभरणी मानला जातो. त्यामुळे सर्व पालकांचे शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे लक्ष या परीक्षेकडे आहेत. त्यामुळे आज साडे पंधरा लाख विद्यार्थी हे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देतील, या रीतीने माध्यमिक परीक्षा मंडळाने त्याबाबतचे सर्व सूचना सर्व परीक्षा केंद्रांवर दिलेल्या आहेत.





एकूण परक्षार्थी विद्यार्थी : बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनी दहावीची परीक्षा देणार आहेत. तसेच ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थी परिक्षा देत आहेत. राज्यातील २३ हजार १० शाळांतून विद्यार्थ्यांची परिक्षेसाठी नोंदणी झाली आहे. परीक्षा पारंपरिक पद्धतीने होईल आणि १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित असेल, असे स्पष्ट केले आहे.





कॉपीमुक्त वातावरण 'असे' केले जाईल :गेल्या दोन वर्षात म्हणजे कोरोना काळात ही परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित घेतली होती. प्रश्नपत्रिका कस्टडीतून केंद्रांवर तसेच केंद्रांतून वर्गापर्यंत जाताना प्रत्येक वेळी चित्रीकरण केले जाईल, जीपीएस ट्रॅकिंग केले जाणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला जाईल. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाईल, अशी माहिती दिली.


विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या सूचना : विद्यार्थ्यांना सकाळी साडे दहा वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे, तर दुपारच्या सत्रात २.३० वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे. हॉल तिकीटवर देखील टाईमटेबल नमूद केलेले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अनेक नियम यावर्षी बदलण्यात आले आहेत. उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाईल इत्यादी कोणतेही उपकरण सोबत आणू नये ते घरीच ठेवावे, जेणेकरून ते हरणार नाही आणि प्रवेश बारावर या सर्व वस्तू बाजूलाच काढून ठेवावा लागणार आहेत, याची नोंद घ्यावी असे देखील परीक्षा मंडळाने म्हटले आहे.

हेही वाचा : Sanjay Raut on Shinde Group: अलीबाबा आणि चाळीस चोर हे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details