महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : नोंदणीकृत नसलेल्या घरेलू कामगारांसाठी विशेष व्यवस्था करावी - CORONA LOCKDOWN

कोविडच्या काळात बांधकाम मजुरांना आर्थिक मदत केल्यानंतर महाविकास आघाडीने घरेलू कामगारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. घरकाम करणाऱ्या कामगारांसाठी 15 कोटी 82 लाख 50 हजार रुपये वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात घरकाम करणाऱ्या कामगारांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, नोंदणीकृत असलेल्या घरेलू कामगारांना ही मदत मिळणार आहे. यामुळे नोंदणीकृत नसलेल्या घरेलू कामगारांसाठी काही तरी मार्ग काढावा अशी मागणी असा घरेलू कामगार संघटनांनी केला आहे.

घरेलू कामगारांची अडचण
घरेलू कामगारांची अडचण

By

Published : May 8, 2021, 1:55 PM IST

मुंबई - कोविडच्या काळात बांधकाम मजुरांना आर्थिक मदत केल्यानंतर महाविकास आघाडीने घरेलू कामगारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. घरकाम करणाऱ्या कामगारांसाठी 15 कोटी 82 लाख 50 हजार रुपये वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात घरकाम करणाऱ्या कामगारांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, नोंदणीकृत असलेल्या घरेलू कामगारांना ही मदत मिळणार आहे. यामुळे नोंदणीकृत नसलेल्या घरेलू कामगारांसाठी काही तरी मार्ग काढावा अशी मागणी असा घरेलू कामगार संघटनांनी केला आहे.

घरेलू कामगारांसाठी विशेष व्यवस्था करावी
करोनाच्या दुसऱ्या लाटेत घरकाम करणाऱ्या कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी रक्कमही मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही रक्कम केवळ ‘महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा’त नोंदणी असलेल्या महिलांना मिळणार असल्याने उर्वरित लाखोजणी लाभापासून वंचित राहणार आहेत.
काम करताना महिला
मुंबई आणि जवळपास 5 लाखांच्या आसपास महिला कामगार आहे. मात्र मंडळाकडे फक्त 1 लाखाच्या आसपासच नोंदणीकृत महिला कामगार आहेत. मात्र मंडळाने या घरेलू कामगारांच्या नोंदणीसाठी कधी पुढाकार घेतला नाही आहे. 1राज्यभरात जवळपास ३५ लाख घरकामगार महिला आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून नोंदणीसाठी दिलेले अर्ज कामगार मंडळाकडे पडून आहेत. घरेलू महिला कामगार अगोदरपासूनच वाऱ्यावर आहेत. आमची हीच आहे एक तर दीड हजार रुपये हे काही मदत होऊ शकत नाही कारण की दीड हजार रुपये मध्ये घर चालत नाही दुसरे म्हणजे जर नोंदणीकृत घरेलू कामगारांची संख्याही मोठी आहे यांच्यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे. सरकारने यांच्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था निर्माण करावी अशी आमची मागणी असल्याचे जीवन एकता सामाजिक संस्थेच्या स्नेहल सुनील आवळेगावकर यांनी सांगितले.सरकारकडून कधी कोणती मदत मिळाली नाही. गेल्यावर्षी मार्चमध्ये अनेकांचे काम गेले आहे आता चार महिन्यांपूर्वी काही कामे मिळाली आहेत. मात्र, ते देखील पुन्हा झालेल्या टाळेबंदी मिळेल जाण्याची शक्यता आहे यामुळे सरकारने आम्हाला मदत करावी असे नीलिमा बागवे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details