महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#COVID19 : मुंबई बाजार समितीत भाजी, फळांची आवक वाढली; नागरिकांना दिलासा - vegetables and fruits imported in mumbai

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे, पालेभाज्या व किराणा वस्तूंचा मुबलक पुवठा आज (दि.26 मार्च) झाला असून पुरवठा करणाऱ्या गाड्या बाजार समितीत दाखल झाले आहेत.यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

बाजार समिती
बाजार समिती

By

Published : Mar 26, 2020, 3:11 PM IST

मुंबई- कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी जीवनावश्याक वस्तू व सुविधा वगळता संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे, पालेभाज्या व किराणा वस्तूंची मुबलक आवक आज (दि.26 मार्च) झाली असून पुरवठा करणाऱ्या गाड्या बाजार समितीत दाखल झाल्या आहेत.

बाजार समितीत भाजी, फळांची वाहने दाखल

काही वाहने भरून हा साठा आला आहे. आजची आवक ही चांगली असल्याचे येथील काही व्यापाऱ्यांनी सांगितले. मुबलक साठा आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी 31 मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी जाहीर केली होती. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत होते. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे.

हेही वाचा -कोरोनामुळे देशभरातील 15 लाख 62 हजार घरांचे बांधकाम 'लॉकडाऊन'

ABOUT THE AUTHOR

...view details