मुंबई - दहिसर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मनीषा चौधरी यांच्या प्रचारार्थ रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. दहिसर येथील फडके पूल ते वैशालीनगर पर्यंत रोड शो करून मनीषा चौधरी यांनी शक्ती प्रदर्शन केले. या रोड शोमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मनीषा चौधरी यांचा प्रचार केला.
मनीषा चौधरींच्या प्रचारासाठी स्मृती इराणी मैदानात - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
दहिसर येथील फडके पूल ते वैशालीनगर पर्यंत रोड शो करून मनीषा चौधरी यांनी शक्ती प्रदर्शन केले. या रोड शोमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मनीषा चौधरी यांचा प्रचार केला.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
हेही वाचा - महाराष्ट्र दौरा : नरेंद्र मोदींच्या 'या' शहरात होणार सभा, स्मृती इराणींची माहिती
दहिसर परिसरात मोठया संख्येने गुजराती समाज राहतो. मनीषा चौधरी यांनी राजकीय कारकिर्दीत अनेकांना मदत केली. त्यामुळे त्यांच्या विजय निश्चित झाला आहे. मी त्यांचे आत्ताच अभिनंदन करत आहे, अशी प्रतिक्रिया स्मृती इराणी यांनी दिली. भाजप आणि रिपाई कार्यकर्ते या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.