महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनीतील झोपडपट्टीला आग - झोपडपट्टी

चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतील आदित्य बिर्ला महिला वसतीगृहाजवळील झोपड्यांना आग लागली आहे.

झोपडपट्टीला लागलेली आग

By

Published : Mar 26, 2019, 10:14 PM IST

मुंबई - चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतील आदित्य बिर्ला महिला वसतीगृहाजवळील झोपड्यांना आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

झोपडपट्टीला लागलेली आग

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ४ अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीसही घटना स्थळी पोहोचले असून आग नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही आग लेव्हल-२ ची असून यात कुणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details