मुंबई - कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेबाबतचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिला. मात्र, यासाठी एनआयएच्या कलम ६५ प्रमाणे आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते. ते त्यांनी घेतले नाही. एनआयएच्या कलम १० प्रमाणे राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची समांतर चौकशी करता येते. याविषयी कायदेशीर सल्ला घेवून चौकशीची पुढील दिशा ठरवू, अशी माहिती माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
'कोरेगाव भीमा प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणार' - anil deshmukh
कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला असला, तरी याची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, असा सर्वांचा आग्रह आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
'भीमा कोरेगाव प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणार'
हेही वाचा -हैदराबादमध्ये घुमणार 'शिवजन्मोत्सवा'चा आवाज.. तेलंगणा मराठा मंडळ जयंतीसाठी सज्ज
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देशमुख यांनी ही माहिती दिली. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला असला, तरी याची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, असा सर्वांचा आग्रह आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
Last Updated : Feb 17, 2020, 10:04 PM IST