मुंबई - उन्हाळ्यात विशेषतः सुटीच्या दिवसात एप्रिल ते जून दरम्यान लग्नसराईचे दिवस असतात. यासाठी विवाहात उच्च प्रतीचा लग्नाचा बस्ता घेण्याकडे सर्वांचा कल असतो. ही गरज लक्षात घेऊन रवींद्र नाट्य मंदिर सिल्क डिझाईन प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात सुवर्ण काम केलेली कांजीवरम साडी, रेशीम साडी महिलांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.
सोने-चांदी मिश्रित सिल्क साडी बनली स्त्रियांचे आकर्षण.. - sarres
या प्रदर्शनात देशभरातील विविध राज्यातील पारंपरिक साड्या उपलब्ध आहेत. हातमाग कारागिरांच्या कलेला चालना मिळावी, हा या प्रदर्शनामागचा उद्देश आहे.
सोने वापरून तयार केलेल्या या साडीची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. ४० ग्रॅम सोने, १०० ग्रॅम चांदीचा यात वापर केला आहे. ३० ते ४० ग्रॅम सोन्याचा वापर करून जरी कार्यकुशलतेने ही साडी हातमागावर बनविण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही साडी तयार करण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे सिल्क डिझायर ऑफ इंडियाचे आयोजक श्रीनिवासन सांगितले.
या प्रदर्शनात देशभरातील विविध राज्यातील पारंपरिक साड्या उपलब्ध आहेत. हातमाग कारागिरांच्या कलेला चालना मिळावी, हा या प्रदर्शनामागचा उद्देश आहे. ४ कारागीर मिळून ही साडी तयार करतात. यावर फोर लेयर कोटींग करण्यात येते. पहिल्यांदा सिल्क कोटिंग केली जाते. दुसऱ्या लेयर वर चांदीची कोटींग करून शेवटी त्यावर सोने कोटींग केले जाते. या साडीसह या प्रदर्शनात तमिळनाडू येथील कोईंबतूर सिल्क कांझीवरम सिल्क, कर्नाटकची बंगळुरू सिल्क क्रेप आणि जार्जेट साडी, बंगळुरू सिल्क मटेरियल, आसाम मूगा सिल्क जामावार वर्क साडी आंध्र प्रदेश येथील कलमकारी, पोचमपल्ली मंगलगिरी, ड्रेस मटेरियल उपाडा, गड़वाल घर्मावरम, प्योर सिल्क साडी, बिहार येथील टसर, महाराष्ट्रीयन लोकप्रिय जरी पैठणी साडी, भागलपूर सिल्क ड्रेस मटेरियल, ब्लॉक हँडप्रिंट खादी सिल्क आणि कॉटन मटेरियल आदी प्रकारच्या साडी उपलब्ध आहेत.