मुंबई - आज गणेश चतुर्थी म्हणजेच बाप्पाची प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे. या निमित्ताने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात, काल रात्रीपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. विशेष म्हणजे, सिद्धिविनायक मंदिरात करोडो रुपयांच्या हजार फुलांनी मंदिराची सजवाट केली आहे. तर, दिवसभरात देशातील लाखों भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज ट्रस्टने व्यक्त केला आहे. चतुर्थी असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त बप्पाच्या दर्शनासाठी मुंबई मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. तर, पहाटे 5 वाजता सिद्धिविनायक मंदिरात काकड आरतीही करण्यात आली.
गणेश चतुर्थी निमित्ताने सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
आज गणेश चतुर्थी म्हणजेच बाप्पाची प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे. या निमित्ताने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात, काल रात्रीपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत.
गणेश चतुर्थी
सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. संकष्टी चतुर्थी निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. तसेच ट्रस्टच्यावतीने मंदिराला फुलांची आरास करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल हजार किलो फुले वापरण्यात आली असून झेंडू ,शेवंती आणि गुलाब या फुलांचा समावेश या सजावटीत आहे. फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट मंदिरावर आणि मंदिरात करण्यात आली आहे. भाविक मोठया भक्ती भावाने दर्शन करत आहेत.