मुंबई- सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयचे पथक सलग 7 दिवसांपासून तपास करीत आहेत. आज मुंबईतील सांताक्रूज येथील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआय पथकासमोर चौकशीसाठी सिद्धार्थ पिठाणी व रिया चक्रावर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती हे दोघे हजर झाले आहेत. तसेच सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरज सिंह व केशव हे दोन कर्मचारीदेखील सीबीआय समोर हजर झाले आहेत. सीबीआय पथकाकडून शोवीक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज सिंग व केशव या चौघांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.
सिद्धार्थ पिठाणीसह शोविक चक्रवर्ती सीबीआय पथकासमोर चौकशीसाठी हजर
रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठाणी दोघेही सीबीआय पथकासमोर हजर झाले आहेत. तसेच सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरज सिंह व केशव हे दोन कर्मचारीदेखील सीबीआय समोर हजर झाले आहेत. सीबीआय पथकाकडून शोविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज सिंग व केशव या चौघांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.
सुशांतसिंह राजपूत
सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सीबीआय करीत असून यातील आर्थिक व्यवहारांचा तपास ईडी करीत आहे. रिया चक्रवर्तीचे ड्रग्स डीलर सोबतचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर दिल्लीतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसुद्धा तपास कामात गुंतले आहे. दरम्यान, रियासह चार जणांविरोधात एनसीबीने गुन्हा नोंदविला असून एनसीबीची एक टीम गोवा येथे तपासासाठी पोहोचली आहे.
Last Updated : Aug 27, 2020, 11:53 AM IST