मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात ईडीकडून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी व सुशांतसिंहच्या सीएची चौकशी झाली. यानंतर यासंदर्भात ईडी कार्यालयात मंगळवारी श्रुती मोदी ही चौकशीसाठी हजर झाली आहे. श्रुती मोदी ही रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्या कंपनीचा व्यवहार पाहत होती. काही काळ तिने या दोघांच्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे. याबरोबरच सुशांतची बहीण मितुसिंह हिलाही ईडीकडून चौकशीसाठी बोलविण्यात येऊ शकते.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : श्रुती मोदी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर - श्रुती मोदी ईडी चौकशी
सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांनी बिहार पोलिसांकडे दाखल केलेल्या गुन्ह्यात श्रुती मोदी हिच्या विरोधातही तक्रार दाखल केली आहे. सुशांतच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारात श्रुती मोदी ही सुद्धा सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बिहार पोलिसांकडून सीबीआयला गुन्हा वर्ग केल्यानंतर सीबीआयच्या एफआयआरमध्ये एकूण सहा जणांची नावे आहेत. त्यात श्रुती मोदीचेही नाव आहे.

दरम्यान, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर यात संशयित आरोपींच्या यादीत रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदीसह एका अज्ञात व्यक्तीचे नाव नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सीबीआयने कलम 120 बी , 306, 341,342, 380 , 406 , 420 , 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.