महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युपीएससीत राज्यातून सृष्टी देशमुख अव्वल, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढला - MAHARASTRA UPSC 2019

यंदा युपीएससी परीक्षा पास होण्यात मराठी मुलांची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. देशपातळीवर सृष्टी देशमुखचा पाचव्या क्रमांक असून महाराष्ट्रात ती प्रथम आली आहे.

सृष्टी देशमुख

By

Published : Apr 5, 2019, 11:57 PM IST

मुंबई- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत आयआयटी मुंबईचा कनिष्क कटारीया देशात पहिला आला आहे. तर अक्षय जैन दुसऱ्या स्थानावर आला असून जुनैद अहमदने तीसरे स्थान पटकावले आहे. देशपातळीवर सृष्टी देशमुखचा पाचवा क्रमांक असून महाराष्ट्रातून ती प्रथम आली आहे.

यंदा युपीएससी परीक्षा पास होण्यात मराठी मुलांची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी जाहीर झालेल्या मुख्य परीक्षेच्या निकालामध्ये मराठी टक्का खूप कमी होता. मात्र, यंदा ही टक्केवारी वाढली आहे.

तृप्ती धोडमिसे ही १६ व्या क्रमांकावर आहे. वैभव गोंदणे २५, मनिषा आव्हाळे ३३ आणि हेंमत पाटील ३३ व्या क्रमांकावर आला आहे. एकूण पहिल्या १०० विद्यार्थ्यांची आकडेवारी देण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येदेखील मराठी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे युपीएससीच्या निकालातून समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details