महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shraddha Walkar: श्रद्धाला बनायचं होतं पत्रकार, पण नियतीच्या मनात काही वेगळंचं होतं...जाणून घ्या सविस्तर

वसईच्या श्रद्धा वालकर हत्या (shraddha walkar murder case) प्रकरणाने संपूर्ण देश हळहळला. याचं श्रद्धाला पत्रकार बनायचं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळचं होतं. जाणुन घेऊयात सविस्तर...

Shraddha Walkar
श्रद्धा

By

Published : Nov 16, 2022, 10:02 PM IST

मुंबई: वसईच्या श्रद्धाची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केल्याच्या हत्याकांडात (shraddha walkar murder case) नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केली ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे. आज तिने ऐकले असते तर ती आज जिवंत असती अशी खंत तिचे वडील विकास वालकर यांनी व्यक्त केली आहे. त्यावेळी तिला खूप समजावले. पण तिने ऐकले नाही. स्वतःचे निर्णय स्वतःच घेईल, असा हट्ट तिने केला होता. त्या दोघांच्या रिलेशनशिपबाबत कळल्यावर मी व माझ्या पत्नीने विरोध दर्शवून तू आमची मुलगी नसल्याचे तिला सांगितले होते.

श्रद्धा घर सोडून जाताना तिच्या आईने खूप समजावले. पण तीने काहीही ऐकलं नाही. तिच्या या निर्णयाचा आईला मोठा धक्का बसल्याने ती नेहमीच आजारी पडू लागली. २०२० जानेवारीमध्ये आईचे निधन झाले. हत्या करण्यात आलेल्या श्रद्धाला पत्रकार व्हायचे होते आणि मास मीडियामध्ये शिक्षण घेत होती. मात्र, तिने अर्धवट शिक्षण सोडले. ती थिएटरही करत होती. ती खूप सक्रिय होती आणि तिच्या व्यक्तिमत्त्वात एक स्पार्क होता असे तिच्या एका जवळच्या मित्राने सांगितले आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एव्हरशाईन येथील ज्या इमारतीत ते दोघे भाड्याने राहत होते. त्या सदनिकेच्या भाडे ऍग्रीमेंटवर आफताब आणि श्रद्धा यांनी पती-पत्नी म्हणून उल्लेख केल्याचे कळते. दिल्ली पोलीसांनी सोमवारी तपासासाठी आरोपी आफताब याला हत्येच्या सदनिकेत व जंगलात ज्या ठिकाणी अवयव फेकले त्याठिकाणी घेऊन आले होते. पोलिसांनी जंगलातून श्रद्धाच्या शरीराचे १२ तुकडे हस्तगत केले आहेत.

मार्चमध्ये दिल्लीत दोघे झाले होते शिफ्ट:आफताब-श्रद्धा मार्च महिन्यात दिल्लीत शिफ्ट झाले होते. येथील पहाडगंजचे हॉटेल व त्यानंतर दक्षिण दिल्लीत ते राहत होते. हत्या केल्यानंतरही आफताबने घरात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये असताना दुसऱ्या एका मुलीला डेट करून तिला या फ्लॅटवर घेऊन आल्याचे सूत्रांकडून कळत आहे. दक्षिण दिल्लीनंतर आफताबने महरौलीच्या जंगलाजवळ फ्लॅट घेतला होता. या जंगलाजवळ फ्लॅट घेऊन देणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले आहे. हत्या केसमध्ये बद्री नामक व्यक्तीची एंट्री झाली आहे. याच व्यक्तीने आफताबला महरौलीच्या भागात फ्लॅट घेऊन दिला होता. पोलिस आता त्याची चौकशी करत आहेत. याच फ्लॅटमधून आफताब मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी जंगलात जात होता. तसेच ज्या डॉक्टरांनी आफताबला टाके मारले, त्या डॉक्टरांना देखील पोलिसांनी गाठले आहे. डॉक्टर अनिल कुमार सिंग यांना फळ कापताना चाकू लागल्याची बतावणी आफताबने केल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी आफताबला पाच ते सहा टाके घातले.

ABOUT THE AUTHOR

...view details