महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tunisha Sharma Suicide Case : श्रद्धा खून प्रकरणामुळे अभिनेत्री तुनिषाशी नाते संपवले; प्रियकर शीझान खानचा जवाब - टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (TV actress Tunisha Sharma) मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी, तिचा माजी प्रियकर शीझान खान याने पोलिसांना सांगितले की (Sheezhan Khans Statement) श्रध्दा वालकरच्या निर्घृण हत्येनंतर (Shraddha murder case) देशातील वातावरण बदलले त्यामुळे अस्वस्थ होतो. यातुन तुनिषा सोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला (ended relationship with actress Tunisha).

Tunisha Subside Case
Tunisha Subside Case

By

Published : Dec 26, 2022, 1:13 PM IST

Updated : Dec 26, 2022, 11:00 PM IST

मृत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा

मुंबई: तुनिषा शर्माच्या (TV actress Tunisha Sharma) मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी, तिचा माजी प्रियकर शीझान खान सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याने वालीव पोलिसांना सांगितले आहे की, श्रद्धा वालकर प्रकरणाचे (Shraddha murder case) परिणाम पाहून त्याने तुनिशासोबतचे नातेसंबंध संपवले (ended relationship with actress Tunisha).. चौकशीदरम्यान त्याने पुढे उघड केले की (Sheezhan Khans Statement) तुनिषाने याआधीही ब्रेकअप झाल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तुनिषाने नुकतेच तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी हा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी मी तिला वाचवले आणि तुनिषाच्या आईला तिची विशेष काळजी घेण्यास सांगितले होते.

श्रद्धा खून प्रकरणामुळे अभिनेत्री तुनिशाशी नाते संपवले

आत्महत्येचे खरे कारण बाहेर यायला हवे - टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरण हे दुर्दैवी आहे. ती एक अतिशय चांगली अभिनेत्री होती, ती सर्वांचा आदर करत असे. ती खूप उत्साही होती. पोलिस याचा तपास करत आहेत. मला वाटते की तिने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण बाहेर आले पाहिजे असे तुनिषा शर्माचा सहकलाकार अभिनेता विनीत रैना यांनी म्हटले आहे. मी त्यांना ( तुनिषा शर्मा तसेच शीझान खान) यांना एकमेकांशी भांडताना पाहिले नाही. ते एकमेकांशी खूप गोड बोलायचे. मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती नाही. दोन्ही बाजू ऐकून सखोल तपास व्हायला हवा असेही अभिनेता विनीत रैना यांनी म्हटले आहे.

९ जणांचे जबाब नोंदवले : अभिनेत्री तूनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिचा प्रियकर मोहम्मद झिशान याला २८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी मालिकेच्या सेटवरील ९ जणांचे जबाब नोंदवले. दोघांचे केवळ साडेतीन महिन्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र प्रेमप्रकरण तुडल्यामुळे आलेल्या नैराश्यातून तुनिशाने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर तुनिषा आणि झीशान यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि ब्रेक-अप झाल्याची माहिती समोर येत आहे.

का झाले होते ब्रेकअप :सध्या श्रध्दा खून प्रकरणानंतर देशात सुरू असलेल्या वातावरणामुळे झिशान तणावात होता, त्यामुळे त्याने वयाचा दाखला देत, तू लहान असल्याचे सांगून आपण मुस्लिम आणि तू हिंदू मुलगी असल्याचे तुनिषाला सांगितले. झिशानने वय आणि धर्माचे कारण देत आरोपीने लग्नास नकार देत ब्रेकअप केले. तुनिषा शर्माने (२१) शनिवारी दुपारी वसईतील एका स्टुडियोत आत्महत्या केली. तुनिशाचे मालिकेतील सहकलाकार मोहम्मद झिशान (२७) याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. झिशानने प्रेमसंबंध तोडल्यानेच तुनिशाने आत्महत्या केल्याची तक्रार तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी केली होती. या तक्रारीनंतर वालीव पोलिसांनी झिशान विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली होती.

साडेतीन महिन्यांचे प्रेमसंबंध: तुनिशा आणि झिशान यांचे जुलै महिन्यात मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, नोव्हेंबर महिन्यात श्रध्दा वालकर प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. त्यामुळे हे प्रेमसंबंध पुढे टिकणार नाही, असे वाटल्याने साडेतीन महिन्यांचे हे प्रेमसंबंध नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस झिशानने तोडले होते. याबाबत दोघांच्या कुटुंबियांना कल्पनाही देण्यात आली होती. त्यांनतरही दोघे एकत्र मालिकेचे चित्रिकरण करत होते. शनिवारी तुनिषा सेटवर नेहमीसारखी वागत होती. परंतु तिने अचानकपणे मेकअपरुममध्ये जाऊन आत्महत्या का केली याचा पोलीस तपास करत आहेत.

15 दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप : या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये असे दिसून आले आहे की दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि 15 दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. तुनिषा शर्मा ही तणावाखाली होती आणि त्यामुळेच तिने टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी तुनिशा आणि शीझान या दोघांचे मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत, जेणेकरून दोघांमध्ये काय झाले आणि 15 दिवसांच्या ब्रेकअपनंतर तुनिषाचा मृत्यू कशामुळे झाला हे समजण्यासाठी मदत होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिले.

'लव्ह जिहाद' च्या दृष्टीकोनातून तपास: तुनिशा शनिवारी सकाळी मालिकेच्या सेटवर जाण्यासाठी तिच्या घरातून आनंदाने निघाली, पहिल्या शिफ्टचे शूट संपल्यानंतर, शीजान खान आणि तुनिशा मेकअप रूममध्ये होते, दोघेही नेहमीप्रमाणे जेवायला गेले होते. मात्र, तुनिषाने तिच्या निधनाच्या दिवशी दुपारचे जेवण केले नाही आणि शीजानने दुपारचे जेवण उरकल्यानंतर दोघांनीही आपापले काम सुरू केले, शीजान सेटवर शूटिंगसाठी गेली आणि तुनिशा मेकअप रूममध्ये गेली. चहापानानंतर तुनिषा शर्मा परत आली नाही, तेव्हा लोकांनी तिला शोधायला सुरुवात केली.अशी माहिती देतानाच पोलिसांनी तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात कथित 'लव्ह जिहाद' च्या दृष्टीकोनातूनही तपास करत आहेत अशी असे सांगितले आहे.

लव्ह जिहाद अँगलने तपास करण्याची आमदार राम कदम यांची मागणी -अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्ये प्रकरणात ( Tunisha Sharma Suicide Case ) आरोपी शीजान खान याला वाळीव पोलिसांनी वसई न्यायालयात हजर केले होते. त्यावर आता त्याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ( Sheezan Khan In Police Custody ) आहे. त्या प्रकरणात आता भाजप आमदार राम कदम यांनी उडी घतली असून, त्यांनी या प्रकरणाचा लव्ह जिहाद अँगलने तपास करण्याची मागणी ( Ram Kadam Demand Investigation In Love Jihad Angle ) केली आहे.

कुटुंबाचा खर्च उचलायची :पोलिस आता तिच्या आत्महत्येमागचे कारण तपासत आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांनी तुनिषाची आई वनिता शर्मा आणि तिच्या मामाचे जबाब नोंदवले आहेत. या घटनेनंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. तुनिषा तिच्या आईसोबत राहायची. कुटुंबाचा सर्व खर्च ती उचलायची, पण आता ती नाही. जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा व्हायला हवी. अशी मागणी तुनिषाच्या काकांनी केली आहे.

तुनिषाची फसवणूक -अभिनेत्री तुनिषा शर्माने उचललेले आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल हे शीझान खानसोबतचे झालेल्या ब्रेकअपमुळे असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर, मृत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी या प्रकरणात धक्कादायक विधान केले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, शीझानने त्याच्या पूर्वीच्या मैत्रिणीशी संबंध असताना तुनिषाची फसवणूक केली. शीझानने लग्नाच्या बहाण्याने तुनिषाचा वापर केला आणि नंतर अचानक सर्व संबंध तोडले म्हणून शीझानला शिक्षा झाली पाहिजे, असेही वनिता शर्मा यांनी सांगितले. तुनिषाचे मामा पवन शर्मा यांनीही शीझानवर आरोप केले आहेत. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे ते म्हणाले.

एसाआयटीद्वारे तपासाची मागणी : अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करून त्याची एसआयटीकडे चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सुरेश गुप्ता यांनी सांगितले की, आज मी ज्या सेटवर तुनिषा शर्माने आत्महत्या केली त्या सेटवर गेलो होतो. या आत्महत्येने लोक घाबरलेले आहेत व लोकांना याबद्दल संशय येत आहे. यामुळे अनेक गोष्टी बाहेर येतील, सेटवर महिला सुरक्षित नाहीत, सेटवर यायला आत खूप घाबरत आहेत. सरकारने या प्रकरणात लक्ष द्यायला पाहिजे. एसआयटीद्वारा या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी मागणी सुरेश श्यामलाल यांनी केली आहे.

Last Updated : Dec 26, 2022, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details