राज्यात तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांत उद्या होणार मतदान
मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदार संघामध्ये मतदान होणार असून २४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात २ कोटी ५७ लाख ८९ हजार ७३८ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.वाचा सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नाशिकमध्ये जाहीर सभा
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (सोमवार दि.२२) मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा होणार आहे. दिंडोरीतील युतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.वाचा सविस्तर
...तर मुंबईतील मोदींची सभा उधळून टाकू, वंचित बहुजन आघाडीचा इशारा
मुंबई- साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरवर दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप असतानाही भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत होणारी सभा आम्ही उधळणार, असा इशारा उत्तर-मध्य मुंबईतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहेमान अंजरिया यांनी दिला.वाचा सविस्तर
पवारांनी पलायन केले तिथेच आम्ही माढा जिंकले- मुख्यमंत्री
सोलापूर- माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याबाबत शरद पवार या बॅट्समनने ७ दिवसांनी माघार घेतली अन् बारावा खेळाडू म्हणून मॅच पाहणे पसंद केले, त्याच दिवशी आम्ही माढा जिंकला आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा-कुर्डुवाडी येथे केला.वाचा सविस्तर
ए लावरे तो व्हिडिओ..! मुंबईतील सभेसाठी परवानगी मिळाली.
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ'चा आवाज मुंबईतही ऐकायला येणार आहे. महापालिकेने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबईत पहिली सभा घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र राज यांना २४ एप्रिलऐवजी २३ एप्रिलला सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही सभा मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात होणार आहे.वाचा सविस्तर
'आमच्या खासदाराने दोनदा तोंड उघडले; एकदा शपथ घेताना, दुसऱ्यांदा जांभई देताना'
पुणे- मोदी रोज एक नवीन घोषणा करतात. पाच वर्षात त्यांनी खूप बढाया मारल्या. त्यांचे खासदारही तसेच आहेत. आमच्याकडे एक खासदार होता. त्याने पाच वर्षात फक्त दोनदा तोंड उघडले. एकदा शपथ घेताना आणि दुसऱ्यांदा जांभई देताना, अशा शब्दात काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शरद बनसोडे यांचे नाव न घेता टीका केली.वाचा सविस्तर
'रमण गये, राणी गई, गये शिवराज मामा, २३ मई को खत्म हो जायेगा चायवाले का ड्रामा'