मुंबई- मुंबईत शिवसैनिकांनी भाजप आमदार आशिष शेलार यांचे वादग्रस्तं होर्डिंग भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरच लावले. तसेच भाजप नेते राज पुरोहीत यांच्या कार्यालयासमोरही आशिष शेलार यांचे होर्डिंग लावण्यात आलेत. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आता शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रस्त्यांवरही दिसून येत आहे.
शेलारांच्या वक्तव्यावर शिवसैनिक आक्रमक; भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरच लावले वादग्रस्त होर्डिंग - आशिष शेलार वक्तव्य
भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेली सुंदोपसुंदी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसैनिकांनी आशिष शेलारांना चांगलेच धारेवर धरले. शेलारांनी याबाबतीत माफी मागितली असली, तरी हा वाद अजूनही निवळण्याची चिन्हे नाहीत.
शेलारांच्या वक्तव्यावर शिवसैनिक आक्रमक
या होर्डिंगमध्ये आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये नग्न अवस्थेत दाखवण्यात आले आहेत. तसेच आ'शिषे' मे देख आणि इतर असंसदीय भाषेतील वाक्ये लिहिण्यात आली आहेत. आशिष शेलार यांनी नालासोपारा येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी मंबईत अनेक ठिकाणी आशिष शेलार यांच्या विरोधात निदर्शने केली आणि होर्डिंगही लावले आहेत.
Last Updated : Feb 5, 2020, 3:27 AM IST