मुंबई- राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. सरकार आणि शिवसेना पुरगस्त भागात मदत करत आहे. येत्या 2 दिवसात आदित्य ठाकरे व मी या पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देऊन तेथील आढावा घेणार आहे. तसेच त्या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत पूरविणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
शिवसेना पूरग्रस्त जिल्ह्यांना वैद्यकीय मदत पुरवणार; उध्दव ठाकरे घेणार पूरस्थितीचा आढावा - Aditya Thackeray
राज्यातील पूर परिस्थिती पाहता शिवसेनेने यात्रा थांबवली आहे. आदित्य त्या भागात जाणार होता मात्र आता जाणार नाही. तसेच शिवसेना पूरग्रस्त ठिकाणी वैद्यकीय मदत पूरविणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
एका बाजूला दुष्काळ आहे तर दुसऱ्या भागात पूरस्थिती. अश्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरू असल्याची शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टिका केली होती. यावर उध्दव ठाकरे म्हणाले की, एकमेकांची उणी-धुणी काढणे चुकीचे आहे. परिस्थितीची कल्पना सर्वांना आहे. पुरामुळे तिथपर्यंत पोहचणारी व्यवस्था नाही. कर्नाटक सरकारने दोन दिवस अगोदर पाणी सोडले असते तर एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली नसती. एकमेकांवर आरोप करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही. राज्यातील पूर परिस्थिती पाहता शिवसेनेने यात्रा थांबवली आहे. आदित्य त्या भागात जाणार होता मात्र आता जाणार नाही. इतर पक्षनेत्यांनी त्यांची भूमिका घ्यावी असे उद्धव ठाकरे म्हणाले.