महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कलाकारांना म्हाडाची स्वस्त घरे मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार - Sushant Shelar

टिव्ही मालिका क्षेत्रात काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञांना म्हाडाची स्वस्त घर मिळावे, यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

आदेश बांदेकर

By

Published : Jul 14, 2019, 11:33 PM IST

मुंबई- म्हाडामार्फत कलाकारांना स्वस्तात घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी शुक्रवारी शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली.

आदेश बांदेकर

मुंबई एमएमआर विभागामधील कलाकार आणि तत्रज्ञांना विरारमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध केली जातील, अशी माहिती सामंत यांनी दिली. बॅकस्टेजला काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञांना याचा फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले.

राज्यातील विविध जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या कलाकारांना संबंधित जिल्हा विभागातच म्हाडाची घरे उपलब्ध होतील, असे आश्वासन म्हाडाकडून आदेश बांदेकर यांना देण्यात आले.

चित्रपट सेनेचे सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार, दिगंबर नाईक आदी यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details