महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CSMT BRIDGE : प्रशासनाच्या'अनेक पायांच्या शर्यतीमुळेच' घडली दुर्घटना, शिवसेनेने फोडले खापर - प्रशासन

मुंबईचा अनियंत्रीत विस्तार, नागरी सुविधांवर पडणारा ताण, बिघडलेले शहर नियोजन हे जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उध्दव ठाकरे

By

Published : Mar 16, 2019, 10:46 AM IST

मुंबई - महापालिका, राज्य सरकार, म्हाडा अशा अनेक प्रशासन यंत्रणांची एकाच वेळी मुंबईत कामे सुरू असतात. त्यांची अनेक पायांची शर्यत सुरू असते. त्याचा परिणाम कामांच्या वेगावर आणि गुणवत्तेवर होतो, असे शिवसेनेने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे. गुरुवारी सीएसएमटी जवळील पादचारी पुलाची दुर्घटना घडली होती. त्यावर सेनेने थेट प्रशासनावर खापर फोडले आहे.

मुंबईत झालेल्या आतापर्यंतच्या अपघातांची उजळणी शिवसेनेने केली आहे. याला मुंबईचा अनियंत्रीत विस्तार, नागरी सुविधांवर पडणारा ताण, बिघडलेले शहर नियोजन हे जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागरी सुविधा, इतर व्यवस्था, दुरुस्ती देखभाल करणे प्रशासनातील गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे अवघड आहे. एकाच वेळी महापालिका, राज्य सरकार, म्हाडा, रेल्वे अशा अनेक प्रशासन यंत्रणा काम करतात. त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होते, असे शिवसेनेने म्हटले आहे.

या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होईल. दोषींविरोधात कारवाई होईल. पण, विरोधी पक्ष या दुर्घटनेचा राजकारणासाठी वापर करतील, अशी शक्यता शिवसेनेने वर्तविली. या अपघाताला जबाबदार कुणीही असले तरी त्यात जीव गेलेली माणसे आपलीच होती. त्याचे आम्हाला दुःख आहे असे शिवसेनेने सांगितले. केलेल्या कामांचे रि-ऑडिट करण्याची वेळ का आली, याचा विचार प्रशासन यंत्रणांनी करावा असे सांगून शिवसेनेने प्रशासनाकडे बोट दाखवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details