मुंबई - राज्यात अद्यापही सत्ता स्थापन झालेली नाही. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी सेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या घडामोडींना आज वेग आल्याचे चित्र दिसत आहे. या भेटीनंतर आता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच संजय राऊत देखील उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर गेले आहेत.
संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले राज्यातील अस्थिर परिस्थितीबाबत पवारही चिंतातूर - shivsena sanjay raut
राज्यात अद्यापही सत्ता स्थापन झालेली नाही. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी सेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. आता संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतल्यावर पवार काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेहमी प्रमाणे सदिच्छा भेट होती. तसेच आम्ही विरोधात बसणार आहोत, असे शरद पवारांनी सांगितले असल्याचे राऊत म्हणाले. तसेच राज्यातील अस्थिर परिस्थितीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली असल्याचेही राऊत म्हणाले. मात्र, थोड्यावेळानी पवार आपली भूमिक जाहीर करतील.संजय राऊतानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि रामराजे निंबाळकर देखील पवारांच्या भेटीला गेले होते.
गेल्या २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. मात्र, अद्यापही राज्यात सरकार स्थापन होऊ शकले. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सारखी खडाखडी सुरू आहे. त्यातच गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत अनेक नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. सोमवारी शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली होती. यावेळी राज्यात काहीही होऊ शकते, असे म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला होता. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेसाठी नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये पवार काय भूमिका स्पष्ट करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.