मुंबई- सुजय विखे-पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे वडील विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस सदस्य राधाकृष्ण विखे-पाटील यांना शिवसेनेत येण्याची ऑफर संजय राऊत यांनी दिली आहे.
राधाकृष्ण विखे-पाटलांना शिवसेनेची ऑफर
सुजय विखे-पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे वडील विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस सदस्य राधाकृष्ण विखे-पाटील यांना शिवसेनेत येण्याची ऑफर संजय राऊत यांनी दिली आहे.
ठाकरे कुटुंबीयांमध्ये निवडणुका न लढता राजकारणावर अंकुश ठेवणे, ही पंरपरा आहे. आदित्य ठाकरेही हीच पंरपरा पुढे चालवतील, तरुणांना वाटत असते आपल्या नेत्यांनी निवडणूका लढवाव्यात तसे झाले तर आम्ही आदित्य ठाकरेंना गळ घालू, असेही ते यावेळी म्हणाले.
शरद पवारांचे राजकारण हे चकवे देणारे राजकारण आहे. त्यामुळे कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नये. शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. पवार यांचा माघार घेण्याचा निर्णय एकाप्रकारे पार्थ पवार यांचे लाँचिंग आहे, असेही ते यावेळी म्हणाले.