महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपला आत्मचिंतनाची गरज; झारखंड निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया - भाजप विरूद्ध शिवसेना

अमृता फडणवीस यांच्याविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले, की अमृता फडणवीस यांच्या टीकेवर शिवसेनेची महिला आघाडीच उत्तर देईल.

sanjay raut
संजय राऊत

By

Published : Dec 23, 2019, 3:08 PM IST

मुंबई- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा फायदा भाजपला होईल, अशा प्रकारची भाषणं झाली. पण, तरीही झारखंडच्या गरीब आणि आदिवासी जनतेनं भाजपला नाकारलं आहे. तिथे सध्या हाती आलेल्या कलानुसार झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपला आता आत्मचिंतनाची गरज असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी झारखंड निकालावर दिली.

संजय राऊत

हेही वाचा -'सत्तेत असताना 'सामना' वाचला असता, तर सत्ताही वाचली असती'

महाराष्ट्रानंतर झारखंड हे राज्य भाजपच्या हातातून गेले आहे. तिकडे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. आधी भाजपची सत्ता तिकडे होती. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी हे राज्य जिंकण्यासाठी ताकद लावली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे राऊत म्हणाले.

अमृता फडणवीस यांच्याविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले, की अमृता फडणवीस यांच्या टीकेवर शिवसेनेची महिला आघाडीचे उत्तर देईल.

ABOUT THE AUTHOR

...view details