महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेचे संख्याबळ योग्य वेळी कळेल; संजय राऊत अन् राज्यपालांमध्ये राजकीय स्थितीवर चर्चा - sanjay raut and koshyari meeting

खासदार संजय राऊत, रामदास कदम राज्यपाल कोशयारी यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी राज्यपालांना बाळासाहेबांचे 'फटकारे' हे पुस्तक भेट दिले. तसेच उद्धव ठाकरे यांचेही पुस्तक भेट दिले. तसेच राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली.

संजय राऊत

By

Published : Nov 4, 2019, 4:03 PM IST

Updated : Nov 4, 2019, 6:53 PM IST

मुंबई - सत्ता स्थापनेला का उशीर होत आहे? हे आम्हाला माहीत नाही. त्यासाठी राज्यपालांना आम्ही सूचना करू शकत नाही. तसेच सत्तास्थापनेसाठी शिवसेना जबाबदार नाही. ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांची सत्ता स्थापन होईल. शिवसेनेकडे किती आमदारांचे संख्याबळ आहे? हे योग्य वेळी कळेलच. ही सदिच्छा भेट होती. तरीही राज्यातील राजकीय स्थितीबाबत राज्यापालांशी चर्चा केली, असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत अन् राज्यपालांमध्ये राजकीय स्थितीवर चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत बोलताना, नवीन सरकार लवकरच स्थापन होईल, असा विश्वास असल्याचे वक्तव्य केले. त्यावर संजय राऊत यांना विचारले असता, भाजप स्थिर सरकार देऊ शकते, याबाबत मला काहीही माहीत नसल्याचे सांगितले.

शिवसेनेचे संख्याबळ योग्य वेळी कळेल

हे वाचलं का? -मला विश्वास, नवीन सरकार लवकरच स्थापन होईल - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या जनतेने भाजप-शिवसेना युतीला स्पष्टपणे कौल दिला आहे. मात्र, केवळ मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षात घमासान सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे अद्यापतरी दिसत नाहीत. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी शिवसेना अडून बसली आहे. मात्र, भाजप महत्त्वाची मंत्री पदे सोडायला तयार नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी विलंब होत आहे. आता संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामध्ये राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Nov 4, 2019, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details