महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मातोश्री क्रीडा संकुलात ‘कोविड सेंटर’ सुरू करा, आमदार वायकर यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार मातोश्री क्रीडा संकुल हे बंद ठेवण्यात आले आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने जास्तीत जास्त रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत यासाठी अंधेरी पूर्वेकडील जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवरील ‘मातोश्री क्रीडा संकुल’मध्ये तात्पुरत्या स्वरुपात पालिकेच्या माध्यमातून संपुर्ण यंत्रणेसह कोविड सेंटर सुरु करावे, अशी मागणी वायकर यांनी केली

By

Published : Apr 22, 2021, 12:39 PM IST

रविंद्र वायकर, रविंद्र वायकर पत्र
रविंद्र वायकर

मुंबई - शहरासह उपनगरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावेत, यासाठी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनी मातोश्री क्रीडा संकुलात पालिकेच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी आज केली. या संदर्भातील पत्र पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना दिल्याचे वायकर यांनी सांगितले.

व्यवस्थेवर ताण वाढलाय -

महाराष्ट्रासोबतच मुंबई शहर तसेच उपनगरात कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शासकीय, महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड मिळणे अशक्य झाले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला आहे. राज्य शासन तसेच मुंबई महानगरपालिका रुग्णांना उपचार मिळविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहे.

रुग्णांना दिलासा मिळेल -

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार मातोश्री क्रीडा संकुल हे बंद ठेवण्यात आले आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने जास्तीत जास्त रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत यासाठी अंधेरी पूर्वेकडील जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवरील ‘मातोश्री क्रीडा संकुल’मध्ये तात्पुरत्या स्वरुपात पालिकेच्या माध्यमातून संपुर्ण यंत्रणेसह कोविड सेंटर सुरु करावे, अशी मागणी वायकर यांनी केली आहे. मनपा आयुक्त इक्बाल चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना पत्र पाठवले आहे. रुग्णांची संख्या कमी होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केल्यास अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा तर मिळेलच, त्याचबरोबर अनेक रुग्णांचे जीवही वाचू शकतील, असेही वायकर यांनी पत्रात नमुद केले आहे. तसेच कामी ट्रस्टकडूनही योग्य सहकार्य केले जाईल, असे ही वायकर यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details