मुंबई- शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी राज्यातील नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पैशांचा वापर करावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. खासदार शेवाळे यांच्या या मागणीला काँग्रेसचे महापालिकेतील विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी विरोध केला आहे. आपण या मागणीही असहमत असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.
शिवसेना खासदार शेवाळेंच्या 'त्या' मागणीला काँग्रेसचा विरोध
केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे जीएसटी पोटी २४ हजार कोटी रुपये थकीत आहेत. केंद्र सरकारने ते रुपये राज्याला तातडीने दिले तर राज्यातील जनतेला कोविडबाबत अधिक चांगल्या सेवासुविधा देता येतील.
शेवळेंच्या मागणीला विरोध
राज्यातील १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून मोफत लस देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेकडून पैसे घ्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. तसेच, राज्य सरकारने नंतर मुंबई महापालिकेचे पैसे परत करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, या मागणीशी आपण असहमत आहोत, असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटले आहे. यावर लॉकडाऊनच्या काळात आर्थिक फटका बसल्याने राज्यातील व मुंबईतील सर्व नागरिकांचे लसीकरण हे मोफत व्हावे, यात काही दुमत नाही. तसेच, मुंबईकरांचे लसीकरण व त्यांचा कोविड उपचारावरील संपूर्ण खर्च हा मुंबई महापालिकेनेच आतापर्यंत केला आहे, करीत आहे व यापुढेही करीत राहील असे रवी राजा यांनी म्हटले आहे.
केंद्राकडे मागणी करावी
केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे जीएसटी पोटी २४ हजार कोटी रुपये थकीत आहेत. केंद्र सरकारने ते रुपये राज्याला तातडीने दिले तर राज्यातील जनतेला कोविडबाबत अधिक चांगल्या सेवासुविधा देता येतील. राज्य सरकार जनतेला सर्व आरोग्य सुविधा, लस मोफत देईल. तेव्हा खासदार शेवाळे यांनी प्रथम केंद्र सरकारकडे निधीची मागणी करावी, त्यास आम्ही नक्कीच समर्थन देऊ, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.