महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंमलबजावणीच्या दृष्टीने अर्थसंकल्पाची दिशा असावी - नीलम गोऱ्हे

राज्यपालांच्या अभिभाषणातील मुद्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने अर्थसंकल्पाची दिशा असावी.... शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱहेची अर्थसंकल्पीय अधिवेशनावर प्रतिक्रिया... दुपारी २ वाजता विधीमंडळात सादर होणार अर्थसंकल्प

नीलम गोऱ्हे

By

Published : Feb 27, 2019, 1:18 PM IST

मुंबई- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात येणार आहे. यावर राज्यपालांच्या अभिभाषणातील विविध मुद्द्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाची दिशा असावी, असे मत शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.

नीलम गोऱ्हे


गोऱ्हे म्हणाल्या, शेतकरी सन्मान योजनेची योग्य अंलबजावणी करण्यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर कक्ष उभारण्याची गरज आहे. बँकाकडून सहकार्य होत नसल्याने त्याचा पाठपुरावा दुष्काळ निवारण समस्येवर सर्वपक्षीय समित्यांची अंमलबजावणी करणे, राज्यपालांच्या अभिभाषणात वन स्टॉप क्रायसेसचा उल्लेख करण्यात आला. मात्र, त्यासाठी किती निधी तरतूद केला असेल हा प्रश्न आहे. महिला सुरक्षेसाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच अंगणवाडी सेविकांच्याही वाढीव मानधनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.


आज दुपारी २ वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर राज्यमंत्री दिपक केसरकर हे विधानपरिषदेत हा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details