मुंबई - बिहार रेजिमेंटने शौर्य गाजवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या वक्तव्यावर शिवसेनेने मुखपत्र सामनामधून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 'देशावर यापूर्वीही संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत आणि शीख या सारख्या रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय?'' असा सवाल करत शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांवर टीका केली आहे. याचबरोबर शिवसेनेने पंतप्रधान मोदींसह गोपीचंद पडळकर यांचाही समाचार घेतला आहे.
"बिहार रेजिमेंटने शौर्य गाजवले.. मग इतर रेजिमेंट काय तंबाखू चोळत होत्या का?" - shivsena criticized on pm narendra modi
बिहार रेजिमेंटने शौर्य गाजवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशावर यापूर्वीही संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत आणि शीख या सारख्या रेजिमेंट त्यावेळी सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? अशा शेलक्या शब्दात शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांवर टीका केली आहे.
अग्रलेखात काय म्हटले?
"पवार हे लहान समूहांचा वापर करतात असे गोपीचंद म्हणतात. मग गोपीचंद यांना भाजपने आमदार का केले ? हेदेखील लहान समूहांना वापरण्याचे राजकारणच आहे. या राजकारणात पंतप्रधान मोदीही तरबेज झाले. लडाखमधील गलवान खोऱ्यात "बिहार रेजिमेंट ने शौर्य गाजवले असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले, पण बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील 'जात' , 'प्रांत' यास महत्त्व आणले जात आहे. हे असे राजकारण म्हणजे कोरोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे! महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे. त्यामुळे गावोगाव जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली, असल्याचा निशाणाही सामनातून साधण्यात आला आहे.