महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क - उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. वांद्रे मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.

उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

By

Published : Oct 21, 2019, 12:49 PM IST

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. वांद्रे येथे त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरेही होते.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून आपले भविष्य आजमावत आहेत. त्यांच्या रुपाने ठाकरे घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश मानेंना उमेदवारी दिली आहे. तर बीग बॉस फेम अभिजीत बिचकुलेही या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

किती मतदार बजावणार मतदानाचा हक्क? -
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.


मतदान केंद्र -
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details