मुंबई -एकीकडे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच मंचावर महायुतीची ग्वाही दिली असतानाच, विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या फॉर्मुल्यावर शिवसेना नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यासंदर्भात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचेही सांगितले जात आहे.
जागा वाटपावरून युतीत तणाव; शिवसेना अमित शाहांशी करणार चर्चा - elections
भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद येथे महायुतीचे जागावाटप झाले असल्याचे सांगितले. शिवसेना आणि भाजप १३५ जागांवर लढणार तर, मित्रपक्षांना १८ जागा देणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. पाटील यांचा हा फॉर्मुला शिवसेनेला मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. जागा वाटपाबाबत शिवसेनेचे नेते गृहमंत्री शाह यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद येथे महायुतीचे जागावाटप झाले असल्याचे सांगितले. शिवसेना आणि भाजप १३५ जागांवर लढणार तर, मित्रपक्षांना १८ जागा देणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. पाटील यांचा हा फॉर्मुला शिवसेनेला मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. जागा वाटपाबाबत शिवसेनेचे नेते गृहमंत्री शाह यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जागा वाटपाबाबत कोणताही तणाव नसून लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
एकीकडे मित्र पक्ष सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती सेना, आरपीआय आठवले गट आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष तसेच नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्षही भाजपसोबत असल्याने मित्रपक्षांच्या जागा भाजपच्याच लाभाच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. जरी प्रत्येकी १३५ जागा शिवसेना-भाजपला मिळाल्या तरी मित्रपक्षांच्या जागा धरून भाजपच्या वाट्याला १५३ पेक्षा अधिक जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला हा फॉर्मुला मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत शिवसेनेकडून अद्याप कुणीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, ज्येष्ठ नेते अमित शाह आणि उद्धव ठाकरे एकत्रित बसून निर्णय घेतील असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.