महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाणार प्रकल्प रद्दच असल्याचा दिपक केसरकर यांचा निर्वाळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार पुन्हा होणार असल्याचे सुतोवाच केल्यानंतर पुन्हा या प्रकल्पावर वादंग उठले आहे. आता शिवसेनेचे दिपक केसरकर यांनीही आपला विरोध दर्शवला आहे.

दिपक केसरकर

By

Published : Sep 18, 2019, 9:35 PM IST

मुंबई -कोकणात पर्यावरणपूरक व्यवसाय हवेत. स्थानिक लोकांच्या विरोधामुळे शिवसेनेने नाणारला विरोध केला होता. सरकारने नाणार प्रकल्प अधिकृतपणे रद्द केला आहे. अधिकृतपणे नाणार होणार असा निर्णय अजून तरी झाला नाही, असे सांगत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेचा नाणारला विरोध कायम असल्याचे म्हटले आहे.

नाणार प्रकल्प रद्दच असल्याचा दिपक केसरकर यांचा निर्वाळा

हेही वाचा - आमच्या मातीत येऊन पवारसाहेबांविषयी बोलण्याची हिंमत कशी होते, धनंजय मुंडेंचा अमित शाहंवर निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार पुन्हा होणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यातून एकच वादंग उठले होते. सर्व राजकीय चर्चा याच मुद्दयापुढे घोळत आहेत. एकीकडे शिवसेना म्हणत आहे की, पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प नको आहे तर भाजपचा गट म्हणतो की, रोजगारासाठी खूप मोठी संधी आहे. राजापूर येथील नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसुचना रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिले होते.

हेही वाचा - तुझा धर्म बघून तुला निवडून दिले का? उद्धव ठाकरेंचा खासदार जलील यांच्यावर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details