मुंबई Shivaji Maharaj International Airport: दिवाळी (Diwali 2023) आणि आंतरराष्ट्रीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा (Cricket World Cup 2023) या निमित्तानं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं प्रवाशांचा उच्चांक गाठलेला आहे. तब्बल एकाच दिवसात एक लाख 61 हजार 419 प्रवासी विमानतळावर दाखल झाले. तर 1032 विमानाने उड्डाण केलं आहे.
तीन दिवसात सव्वा पाच लाख प्रवासी : कोरोना नंतर सणासुदीच्या हंगामात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची प्रचंड संख्या वाढलेली आहे. 11 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या दिवाळी सुट्टीच्या काळात, एकूण पाच लाख 16 हजार 562 प्रवाशांनी वाहतूक केली. तर निव्वळ 11 नोव्हेंबर 2023 रोजी 1032 विमानाने या ठिकाणी उड्डाण केलं.
कोरोना नंतर पहिल्यांदाच प्रचंड गर्दी : तब्बल दोन वर्षानंतर ही दिवाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अधिक उल्हासदायक ठरली. एकूण 11 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या दिवसात पाच लाख 16 हजार 562 प्रवाशांनी ये जा केली. त्यापैकी 3 लाख 54541 प्रवासी देशांतर्गत होते. तर 1 लाख 62 हजार 21 प्रवासी हे आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे होते.
11 नोव्हेंबर रोजी आधीचे रेकॉर्ड मोडले : 11 नोव्हेंबर 2023 रोजी मात्र प्रवाशांचा विक्रमी टप्पा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं गाठला आहे. या एका दिवसात 1032 विमानांनी येथून उड्डाण केलं. तर त्याच दिवशी एक लाख 61 हजार 419 प्रवासी या विमानतळावर उतरले, यामध्ये 53,680 आंतरराष्ट्रीय प्रवासी होते. तर एक लाख 7 हजार 765 प्रवासी देशातीलच होते.