महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray: महाविकास आघाडी एकसंध आहे, एकजूट आणि भक्कम आहे; उद्धव ठाकरेंचा विश्वास - महाविकास आघाडी भक्कम

Uddhav Thackeray: बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा आढावा घेत असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून स्वबळाचा नारा दिला जातो आहे. यावर आपलं काय म्हणणं आहे. ईटीव्हीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तरा दाखल त्यांनी वक्तव्य केले की, महाविकास आघाडी भक्कम आहे, एक संघ आहे, मजबूत आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

By

Published : Nov 5, 2022, 7:38 PM IST

मुंबई:बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा आढावा घेत असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून स्वबळाचा नारा दिला जातो आहे. यावर आपलं काय म्हणणं आहे. ईटीव्हीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तरा दाखल त्यांनी वक्तव्य केले की, महाविकास आघाडी भक्कम आहे, एक संघ आहे, मजबूत आहे.

आमची महाविकास आघाडी भक्कमबाळासाहेब राष्ट्रीय स्मारक या कामासाठी आतापर्यंत 180 कोटी रुपये प्रत्यक्ष खर्च झालेला आहे. आणि या कामाचे कंत्राट टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले गेल्याचं सुभाष देसाई यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये राजकीय प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी टाळले. केवळ राष्ट्रीय स्मारकाविषयी बोला असा आग्रह धरला. मात्र ईटीव्ही भारतच्यावतीने उद्धव ठाकरे यांना अनौपचारिक गप्पांमध्ये प्रश्न विचारला असता, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून स्वबळाच्या नाऱ्याची कुरकुर ऐकू येते. त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे. त्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, या छोट्या कुरकुरीत म्हणजे काय भांडण नाही. प्रत्येक पक्षाला आपले संख्या आपली ताकद वाढवण्याचा पूर्ण अधिकार असतो. आपण त्यावर लक्ष देऊ नये, आमची महाविकास आघाडी भक्कम आणि एकसंध आहे याबद्दल निश्चित आहे.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम गतीनेबाळासाहेब राष्ट्रीय स्मारकाच्या संदर्भात आलेला आहे. आणि हे काम पुढे नेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत वास्तु विशारद आभा लांबा आणि वेगवेगळ्या विषयाचे तज्ञ अशा व्यक्तींचा एक अभ्यास गट नेमला गेलेला आहे. हा अभ्यास गट उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत बारकाईनं स्मारक कसा असावा. स्मारकाचा उद्देश सफल कसा होईल. सर्व सामान्य जनतेला बाळासाहेबांच्या कार्यातून त्यांच्या विचारातून प्रेरणा कशी मिळेल. यासाठी ने कार्यरत असल्याचं सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

तोतया आमदारांना स्मारकात स्थान नाहीपत्रकारांना राजकीय प्रश्न विचारू नका, असा आग्रह उद्धव ठाकरे यांनी केल्यावर तरी एक प्रश्न समोर आलाच. शिवसेनेचा इतिहास या स्मारकामध्ये उभा केला जाईल. पहिला महापौर, पहिला नगरसेवक, पहिला आमदार, पहिले मुख्यमंत्री हे सर्व त्यात दाखवण्यात येईल. का ह्या प्रश्नावर उपस्थित सर्वांमध्ये हास्य पिकले. या हास्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतः घर घातली आणि त्यांनी विधान केले की, होहो खरे शिवसैनिक या स्मारकाच्या सर्व रचनेमध्ये निश्चित असतील. आणि तोतय शिवसैनिक आणि तोतही आमदार मात्र त्यामध्ये नसतील. एवढं मात्र लक्षात ठेवा हे विधान केल्यावर पुन्हा सर्वांना हास्य आवरता आलेले नाही.

काही आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात राज्यामध्ये हे सरकार शिंदे फडणवीस सरकार जाणार 145 पेक्षा एक जरी आमदार कमी झाला. तरी सरकार पडू शकत, असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी, काँग्रेस पक्षाचे काही आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचे विधान केले आहे .या विधानाच्या उत्तरा दाखल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोचरी टीका केली आहे. जे स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाही, त्यांनी अशी टीका करू नये असं म्हटले आहे. या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना ईटीव्हीवतीने प्रश्न +91 86558 25244 एकजूट आहे. आणि येणाऱ्या सर्व गोष्टींना ती तयारीने सामोरे जाणार आहे.

राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये उद्धव ठाकरे सामीलदेशभरात राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे एक उत्साह संचारलेला आहे. युवक या यात्रेकडे आकृष्ट झालेले आहेत. त्या अनुषंगानेच उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला गेला की, आपणही या यात्रेत सामील होणार का ? तसेच काँग्रेसच्या पदयात्रेमध्ये आपण सामील होणार आहेत का ? या देखील प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी सूचक सकारात्मक वक्तव्य केलं की, पाहूया आमचा पदयात्रेला पाठिंबा आहे. समर्थन देखील आहे. आदित्य जाणार आहेत. इतर नेतेमंडळी जाणार आहेत. मी देखील जाईल, पण आता नक्की नियोजन काय सांगता येत नाही. असे उत्तर दाखल म्हणत त्यांनी काँग्रेसच्या पदयात्रेच्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details