महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांदा खाऊ नका... म्हणणे मस्तवालपणा - संजय राऊतांचा दादा भुसेंना टोला - संजय राऊत यांची दादा भुसेंवर टीका

टॉमेटोनंतर आता कांदा चर्चेत आलाय. नुकतंच, माजी कृषीमंत्री दादा भुसे यांनी कांदा परवडत नसेल तर खाऊ नका. दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडणार आहे का, असं वक्तव्य केलंय. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केलीय. (Sanjay Raut criticized Dada Bhuse)

Sanjay Raut criticized Dada Bhuse
खासदार संजय राऊत

By

Published : Aug 22, 2023, 2:11 PM IST

मुंबई :राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत राष्ट्रवादीचे अजित पवार सामील झाल्यामुळं आता राज्यात महायुतीचं सरकार कार्यरत आहे. शिवसेना शिंदे गटातील मंत्री कोणत्या, ना कोणत्या आरोपामुळे नेहमीच विरोधकांच्या लक्ष्यस्थानी राहिले आहेत. कांद्याच्या मुद्द्यावरून माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या वक्तव्यावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. 'दीड शहाण्या मंत्र्याला राज्याची स्थिती माहीत नाही का?' अशा प्रकारची भाषा, मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झालीय, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दादा भुसेंचा समाचार घेतलाय.

'मग' सरकार कशासाठी :शिवसेना ठाकरे गटाचेखासदार संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात प्रश्नासंदर्भात आपली भूमिका मांडलीय. रोमचा राजा म्हणाला होता की, जर तुम्हाला ब्रेड खाता येत नसेल, तर केक खा. पण 'हे' स्वतः कांद्यावरती ताव मारतात. यांच्या घरी कांद्याची पोती आहेत. सामान्य माणसाने कांदा आणि भाकरी खायची नाही. कांदा हे गरीबाचं खाणं आहे, ते श्रीमंतांचं खाणं नाही. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा, असं आमचं म्हणणं आहे. घरातल्या गृहिणीला कांद्यापासून वंचित ठेवू नये, ही आमची भूमिका आहे. जर सरकार म्हणते त्या गोष्टी खाऊ नका, तर मग सरकार कशासाठी आहे, असं त्यांनी केंद्र सरकारला विचारलंय.

मस्तवालपणा खोक्यातून :राज्याचे सध्याचे मंत्री यापूर्वी कृषिमंत्री देखील होते. त्यांना राज्याची स्थिती माहीत आहे का? असा प्रश्न राऊतांनी केलाय. कांद्यामुळं भाजपाचं दिल्लीतील सरकार पडलं असल्याची आठवण देखील त्यांनी करून दिली. आम्ही जनतेशी कसेही वागू, बोलू आणि सल्ले देऊ शकतो हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झाला आहे. ही आपल्या राज्याची संस्कृती नाही. एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून खाऊ नका, हा काय सल्ला झाला का? असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी सरकारला लगावला आहे.


केंद्र सरकारला सवाल : चंद्रयान मोहिमेचं श्रेय देशातील शास्त्रज्ञांना दिलं पाहिजे. याचं श्रेय कोणत्याही पक्षानं, प्रधानमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी घेऊ नये. तसेच पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राइकचं श्रेय एका पक्षानं निवडणुकीत घेतलंय. तोच सर्जिकल स्ट्राइक तुम्ही चीनवर का करत नाही, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलंय की, चीनने आपल्या देशात घुसखोरी केलीय, हे खरं असल्याचं राऊत म्हणाले आहेत.


शिवसेना म्हणून केंद्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान :राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाची फोडाफोडी होत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका घ्या. तुम्ही विद्यापीठ निवडणूक घ्यायला घाबरता, महापालिकेच्या निवडणुका घ्यायला तुमच्यामध्ये दम नाही. तुम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आमचा सामना काय करणार, असा सवाल राऊत यांनी विचारलाय. 2024 च्या सरकारमध्ये शिवसेना म्हणून केंद्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut On Eknath Shinde : गरज संपली आता तुम्ही गाशा गुंडाळा- संजय राऊत यांचा शिंदे गटाला टोला
  2. Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं खुशाल कोर्टात जा, मी वकील देतो; संजय राऊतांचा टोला
  3. Sanjay Raut on Sharad Pawar Photo : गुरुदैवताच्या पाठीत खंजीर खुपसता आणि त्यांचाच फोटो लावता; संजय राऊतांनी फटकारले

ABOUT THE AUTHOR

...view details